Arrest|Jail|Crime Canva
गोवा

Goa Crime: साताऱ्यातील तरुणाने गोव्यातल्या युवतीला घातला 19 लाखांचा गंडा, पोलिसांना आवळल्या मुसक्या

Goa Crime News: अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने १८.९९ लाख ८४० रुपये लुटून गोव्यातील तरुणीची फसवणूक केली आहे.

Pramod Yadav

डिचोली: अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका युवतीची जवळपास १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित युवकाला डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या २५ वर्षीय युवकाचे नाव साई सुनील दळवी असे असून महाराष्ट्रातील सातारा येथून डिचोली पोलिसांनी शनिवारी (२८ सप्टेंबर) त्याच्या मुसक्या आवळल्या.

संशयिताविरुद्ध काणकोणसह अन्य काही पोलिस स्थानकात गुन्हे नोंद असून संशयित अन्य पोलिस स्थानकांना हवा आहे. अशी माहिती मिळाली आहे.

यासंबंधीची माहिती अशी की, अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयित साई दळवी यांनी माझ्याकडून १८.९९ लाख ८४० रुपये लुटून माझी फसवणूक केली आहे. अशी तक्रार पाळी डिचोली येथील सोनाली सीताराम गावस या युवतीने डिचोली पोलिस स्थानकात केली होती.

या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून मोठ्या शिताफीने संशयित युवकाला सातारा येथून अटक केली.

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: शुभमन गिल दिल्लीत रचणार 'महाकीर्तिमान'? डॉन ब्रॅडमनचा मोठा रेकॉर्ड निशाण्यावर; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा!

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT