Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Madgaon Gold Theft: ७२ लाखांचे सोने चोरून पसार झालेल्या कारागिरांना अटक, भावानेच दिली 'टिप'

Bengal Thieves Arrest by Goa Police: मडगावात सराफाच्या दुकानातून ७२ लाख किमतीचे सोने लंपास, पसार झालेल्या आरोपींच्या हातात बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश

Akshata Chhatre

मडगाव: मडगावात सराफाच्या दुकानातून सोने घेऊन पसार झालेल्या तीन कारागिरांना अटक करण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित या प्रकरणाचा छडा लावायला सुरुवात केली आणि गुरुवारी (दि. ५ डिसेंबर) रोजी पसार झालेल्या आरोपींच्या हातात बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

मडगावात सराफाच्या दुकानातून तिघा आरोपींनी हात सफाईचा जादू करत ७२ लाख रूपये किमतीचे सोने लंपास केले होते आणि याच चोरांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये दोघांना अटक करून गोव्यात आणले आहे. बाणावली येथील सराफी व्यावसायिक प्रितेश लोटलीकर यांच्याकडे हे तीन कारागीर कामाला होते. प्रितेश लोटलीकर यांच्याजवळ ते सोनं वितळवण्याचं काम करायचे, मात्र त्यांनी तब्बल ७२ लाखांचे सोने पळवत सोनाराला भला मोठा गंडा घातला.  

मडगावच्या कोंब भागात एकूण घटना घडली होती . सराफ प्रितेश लोटलीकर यांना अचानक ९५९ ग्रॅम सोने चोरीला गेल्याचे आढळून आले आणि दुकानात कामाला असलेले तिघेही सापडत नसल्याने लोटलीकर यांचा तिघांवरील संशय बळावला. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तिन्ही आरोपी पश्चिम बंगालचे असल्याने पोलिसांना ते बंगालला पळून गेल्याचा संशय होता आणि म्हणून शनिवारीच एक पोलीस पथक बंगालला रवाना झाले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सुप्रोकोश  मोंडल, संजय मोंडल व तपस जना अशी आहेत. या आरोपींपैकी एकाचा भाऊ गोव्यात रावणफोंडा येथे राहत असल्याने त्याची चौकशी केल्यानंतर आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी सोपे झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSA In Goa: गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: 8.50 कोटी रुपयांची थकबाकी; मुरगाव पालिकेची इंडियन ऑईला कारणे दाखवा नोटीस

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT