Edwin Nunes Dainik Gomantak
गोवा

Edvin Nunes Arrested: कोविडच्या बोगस प्रमाणपत्रप्रकरणी एडविन नुनीस याला अटक

हणजूण पोलिसांची कारवाई; सोनाली फोगाट हत्या प्रकरणात नुनीस संशयित

गोमन्तक डिजिटल टीम

Edvin Nunes Arrested: हणजून येथील कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंटचा चालक एडविन नुनीस याला गुरूवारी हणजून पोलिसांनी अटक केली. बोगस कोविड प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

नुनीस याला दुसऱ्यांदा अटक झालेली आहे. त्याच्यामागे गोव्यासह हैदराबाद पोलिसांचा तपासाचा ससेमिरा सुरूच आहे. न्यायालयाच्या शर्थींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याचा जामिन रद्द करावा, यासाठी पोलिसांनी अर्ज दाखल केला आहे.

टिकटॉकस्टार आणि भाजप नेत्या यांच्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणातही एडवीन नुनीस हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यासह दोघा संशयितांची यापुर्वी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत चौकशी केली आहे. नूनीस सध्या जामीनावर आहे. पण, चौकशीतून पळवाट काढण्यासाठी नूनीसने लढवलेली शक्कल त्याच्या अंगलट आली. कोविड (Covid-19) झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्याच्यावर आणखी एक गुन्हा हणजूण पोलिसांनी (Anjuna Police) दाखल केला होता.

हणजूण पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर 08 सप्टेंबर रोजी त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. नूनीस याची अंमली पदार्थ प्रकरणात चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सूट मिळावी यासाठी नूनीसने आपल्याला कोविड झाला असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना सादर केले होते. या प्रमाणपत्राची खातरजमा केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून नूनीस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT