Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : सुऱ्‍याच्या धाकाने पर्यटकांना लुबाडण्याचा प्रकार उघडकीस

कळंगुटमधील घटना; गुजरातमधील दोघांना गोवा पोलिसांकडून अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : खोब्रावाडा - कळंगुट येथे उत्तरप्रदेशमधील दोघा पर्यंटकांची सुऱ्‍याचा धाक दाखवून लुबाडणूक करण्यात आली असून याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी मूळच्या गुजरातमधील दोघा संशयितांना अटक केली.

दर्शन भोजीया (23, रा. साळगाव) व रवी आंबेलिया (28, रा. खोब्रावाडा - कळंगुट) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे 3.30 च्या सुमारास खोब्रावाडा कळंगुटमधील डेव्हील्स क्लबजवळ घडली. फिर्यादी प्रशीत सिंघाल (शिवपुरी उत्तरप्रदेश) हा व त्याचा चुलत भाऊ चालत जात होते. त्यावेळी संशयित दर्शन याने त्यांना अडवले व आपला साथीदार संशयित रवी यास बालावले.

दोघाही संशयितांनी तक्रारदार व त्याच्या भावाला सुऱ्‍याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील 20 हजार रुपये रोकड जबरदस्तीने काढून घेत पळ काढला. याप्रकरणी फिर्यादी व त्याच्या चुलत भावाने कळंगुट पोलिस स्थानक गाठले व रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वरील दोन्ही संशयितांना पकडून अटक केली. तसेच लुबाडणुकीतील रोख रक्कमही जप्त केली. पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर व सहकारी पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Car Accident: नियंत्रण सुटलं अन् कार नदीत कोसळली... चालकाची जीव वाचवण्यासाठी धडपड, सुदैवाने बचावला; डिचोलीतील घटना

खांद्यावर हात, जबरदस्तीनं सेल्फी! हरमल बीचवर विदेशी महिला पर्यटकांसोबत तरूणांकडून गैरवर्तन, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

WC Prize Money: बक्षिसांचा महापूर! विश्वविजेत्या भारताला मिळालेली रक्कम पाहून व्हाल थक्क, उपविजेत्या आफ्रिकेला किती कोटी मिळाले? पाहा संपूर्ण यादी

मडगांवा भिरांकूळ अपघात; एकल्याक मरण Watch Video

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

SCROLL FOR NEXT