Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नुवे घरफोडीत 'पारधी गँग'चा हात, मायणा कुडतरी पोलिसांनी मुंबईत आवळल्या एकाच्या मुसक्या

Goa Police Investigation: नुवे येथील घरफोडी प्रकरणात ‘पारधी गँग’ चा हात असल्याचे उघड झाले आहे. या टोळीतील एकाच्या गोवा पोलिसांनी मुंबईत मुसक्या आवळल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: नुवे येथील घरफोडी प्रकरणात ‘पारधी गँग’ चा हात असल्याचे उघड झाले आहे. या टोळीतील एकाच्या गोवा पोलिसांनी मुंबईत मुसक्या आवळल्या आहेत. अर्जुन गायकवाड (२१) असे या संशयिताचे नाव आहे. बुधवारी त्याला गोव्यात आणण्यात आले.

या चोरीप्रकरणी गेल्या आठवड्यात मायणा कुडतरी पोलिसांनी दीपक बाबुराव मेंडके (२२) याला जालना (महाराष्ट्र) येथून पकडले होते. तो व्यवसायाने टॅक्सीचालक असून, चोरीसाठी त्याने वापरलेली ‘इनोव्हा’ पोलिसांनी जप्त केली होती.

त्याची कसून चौकशी केली असता, या घरफोडीत पारधी गँगचा सहभाग असल्याचे उघड झाले. एकूण सात जण या घरफोडीत गुंतले असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. पोलिसांचे एक पथक आठवडाभर मुंबई व पुणे या भागात ठाण मांडून होते. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

अर्जुन हा सराईत गुन्हेगार

अर्जुन हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध घरफोड्या तसेच महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ११ जानेवारी रोजी नुवे येथे चोरीची वरील घटना घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT