Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: दवर्लीतील अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागला, संशयित आरोपीला कोल्हापूरातून अटक

Goa Crime: एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मोठी कारवाई करत मायणा-कुडतरी पोलिसांनी संशयित आरोपीला महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून अटक केली आहे.

Sameer Amunekar

पणजी : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मोठी कारवाई करत मायणा-कुडतरी पोलिसांनी संशयित आरोपीला महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून अटक केली आहे. तसेच, पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जोशुआ बंडेवदार (१८) या संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला गोव्यात आणलं असून, पीडितेला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी दावर्ली येथील मारुती मंदिर परिसरातून १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळं त्यांनी तातडीने मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली. माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जोशुआ बंडेवदारचा मागोवा घेतला. अखेर, पोलिसांनी कारवाई करत कोल्हापूरमध्ये जाऊन आरोपीला अटक केली. त्यावेळी पीडित मुलीचीही त्याच्या ताब्यातून सुटका केली.

न्हावेली येथील रहिवासी असलेला आरोपी जोशुआ बंडेवदार (१८) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, समाजमाध्यमांद्वारे अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे, अनोळखी व्यक्तींसोबत घराबाहेर जाणे यासारख्या धोकादायक गोष्टी टाळण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT