Goa Police : झुआरी अपघातानंतर सरकारने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम सक्रीयपणे सुरू केली आहे. पण, या कारवाईसाठी पोलिसांकडे असलेल्या अल्कोमीटर यंत्रापैकी अर्धेअधिक नादुरुस्त आहेत. त्यामुळे मोहीम राबविताना अडथळे येत आहेत. जिल्हा व वाहतूक पोलिसांकडे आवश्यक प्रमाणात ही यंत्रे नसून काही कालबाह्य झालीत. यामुळे सरकारने केलेल्या तीव्र कारवाईच्या घोषणेचा फज्जा उडाला आहे.
वाहतूक पोलिस विभागाकडे सुमारे 100 अल्कोमीटर यंत्रे आहेत. त्यापैकी 70 टक्के यंत्रे नादुरुस्त आहेत. पणजी वाहतूक कक्षाकडे असलेल्या 6 पैकी 2 अल्कोमीटर यंत्रे सुरू आहेत. ही मोहीम वाहतूक व जिल्हा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाली असली तरी जिल्हा पोलिस क्षेत्रातील स्थानकांकडे असलेले एकमेव अल्कोमीटर यंत्रे बिघडली आहेत. त्याच्या बदल्यात नव्याने यंत्रे दिली न गेल्याने रात्रीच्या या मोहिमेत पोलिस रस्त्यावरच दिसत नाही. नवीन अत्याधुनिक अल्कोमीटर यंत्रे कंपन्यांनी तयारी केली आहेत. त्यामुळे त्याच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे व अधिकृत नोंदणीकृत कंपन्यांना त्याची ऑर्डर देणे बाकी आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, अद्यापपर्यंत या महत्त्वाच्या गोष्टीची ऑर्डर का दिली गेली नाही याबाबत प्रश्न आहे.
कालबाह्य यंत्रे; पोलिसांसमोर अडचण
पोलिसांकडील अल्कोमीटर यंत्रे फार जुनी असून त्याची मुदत 2019 ला संपली आहे. तरीही ते दुरुस्त वापरण्यात येतात. पर्वरी, म्हापसा व कळंगुट या पोलिस स्थानकाला दिलेले यंत्र नादुरुस्त असल्याने मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई करणे शक्य होत नाही. अनेक महिने होऊनही ती दुरुस्त करून अजून मिळालेली नाहीत. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होणे अशक्य होत असल्याची माहिती एका पोलिस स्थानकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
अल्कोमीटर यंत्रे जुनी आहेत व ती वारंवार नादुरुस्त होतात. या यंत्राचे सुटे भागही मिळत नाहीत. त्यामुळे नवीन 45 अल्कोमीटर यंत्रांसाठीचा प्रस्ताव मंजूर झाला तरी अधिकृत कंपनीकडून मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली.
या अल्कोमीटर यंत्राने वाहनचालकाची ब्रिथ ॲनलाईझर चेक (बीएसी) करताना चालकाला श्वास आतमध्ये ओढून त्यानंतर जोराने फूक मारावी लागते. अशावेळी मद्यपी चालकाची थुंकी या यंत्रामध्ये जाऊन ती नादुरुस्त होतात. ही यंत्रे अधिकृत कंपनीकडेच दुरुस्तीसाठी देणे भाग आहे. काही कंपन्यानी पोलिसांकडे असलेली अल्कोमीटर यंत्रे कालबाह्य ठरविली आहेत. त्यामुळे त्याची दुरुस्ती शक्य नसल्याचे कळविले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.