Mapusa police raid  Dainik Gomantak
गोवा

Gambling In Goa : राज्यात विविध ठिकाणी 28 जुगाऱ्यांना अटक; लाखो रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त

एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक

दैनिक गोमन्तक

Goa police action mode On gambling activities : राज्यात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण 28 जणांना अटक केली असून लाखो रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले.

कासावली येथील एका बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 15 जणांना अटक केली. यावेळी जुगार साहित्य तसेच २ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. संशयितांची नंतर वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली.

काणकोण पोलिसांनी गुळे येथे पत्त्याच्या जुगारी अड्ड्यावर छापा टाकून अड्डामालकासह चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून पत्ते व ८,४०० रुपयांची रोकड जप्त केली.

म्हापसा पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून १२,९०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

पोलिसांनी टाकलेल्या पाच वेगवेगळ्या छाप्यांमध्ये संशयित अर्जुन गावडे (३८) विजयकुमार ओसवाल (५१), रमेश बुधाथोकी (२१), रोहित रॉय (२८), विजय साळुंके (३५) यांना अटक करून त्यांच्याकडून ५,९०० रुपये जप्त केले.

दुसऱ्या छाप्यात यश नाईक (२७), रवी लमाणी (३४), प्रकाश लमाणी (३०), पांडुरंग तेली (३९) यांच्याकडून ७ हजार रुपये व पत्त्याच्या जुगारांचे साहित्य जप्त केले.

पोलिसांनी एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सीताकांत नायक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने हा छापा टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT