Paresh Narendra Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa: कवी परेश कामतांना डॉ. टी एम्. ए. पै पुरस्कार जाहीर

या कोंकणी कविता संग्रहाला (Konkani Poems) मणिपाल फांऊडेशनचा प्रतिष्ठेचा डॉ टी. एम्. ए. पै उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार 2019 जाहीर करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्याचे (Goa) नामवंत कवी परेश नरेंद्र कामत (Paresh Narendra Kamat) यांच्या 'रंगबोली ' या कोंकणी कविता संग्रहाला (Konkani Poems) मणिपाल फांऊडेशनचा प्रतिष्ठेचा डॉ टी. एम्. ए. पै उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार 2019 जाहीर करण्यात आला. मानपत्र व पंचवीस हजार रूपये रोख अशा स्वरूपांत हा पुरस्कार मणिपाल येथे होणाऱ्या एका खास कार्यक्रमात श्री कामत यांना दिला जाणार आहे.

आतापर्यंत ' अळंग ', 'गर्भखोल', ' शुभंकर', 'चित्रलिपी ' व ' रंगबोली ' असे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झालेल्या कामत यांना त्यांच्या ' चित्रलिपी ' या कविता संग्रहाला २०१८ साली केंद्रिय साहित्य अकादेमी पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांच्या साहित्याला यापूर्वी गोवा सरकारचा ' युवा सृजन पुरस्कार', मुंबईचा गोवा हिंदू असोसिएशनचा पद्मश्री बा. भ. बोरकर स्मृती पुरस्कार, कला अकादमी साहित्य पुरस्कार, जनगंगा साहित्य पुरस्कार, गोवा कोंकणी अकादेमी सर्वोत्कृष्ठ साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कवी परेश कामत यांच्या कविता मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, पंजाबी, उडिया, कन्नड अशा अनेक भाशांत अनुवादीत झालेल्या आहेत. मेघालय, बंगळुरू, केरळ, नागालँड, कोणार्क, औरंगाबाद, हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनांत ते सहभागी झाले आहेत. त्यांच्या कवितांची बी. ए. व एम्. ए. च्या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: विजयाचा नवा सुवर्ण इतिहास! अफगाणिस्तानचा 300 धावांनी उडवला धुव्वा, टीम इंडियाने मोडले 5 मोठे रेकॉर्ड्स

Guru Shukra Yuti 2026: दारिद्र्य संपणार, श्रीमंती येणार! 10 जूनपासून खुला होणार कुबेराचा खजिना; शुक्र-गुरुची युती 3 राशींना बनवणार मालामाल

प्रत्येक पंचायतीला 10 हजार रोपं लावण्याचं टार्गेट! सरकारी आदेशानंतर गोव्यातील गावागावांत जागेसाठी धावपळ; वृक्षारोपणानं समोर आणलं वास्तव

Indian Population: "भारताचा जन्मदर सातत्याने घटतोय..." एलॉन मस्कच्या 'त्या' पोस्टने उडवली खळबळ

FIFA World Cup: मेस्सी एकदा जिंकला...आता रोनाल्डोही जिंकावा

SCROLL FOR NEXT