Pilgao Farmers Protest Impacts Mineral Transport Dainik Gomantak
गोवा

Pilgao Farmers Protest: डिचोलीतील ट्रकमालकांमध्ये अस्वस्थता! शेतकरी आंदोलनाचा आठवा दिवस; मध्यस्थीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Pilgao Farmers Protest Impacts Mineral Transport: पिळगावमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या आठ दिवसांपासून खनिज वाहतूक बंद असल्यामुळे डिचोलीतील ट्रकमालकांची अस्वस्थता वाढली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: पिळगावमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या आठ दिवसांपासून खनिज वाहतूक बंद असल्यामुळे डिचोलीतील ट्रकमालकांची अस्वस्थता वाढली आहे. या आंदोलनाच्या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनाने त्वरित आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनीही आधीच आर्थिक संकटात गटांगळ्या खाणाऱ्या ट्रकमालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी डिचोली ट्रकमालक संघटनेने केली आहे.

कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेऊन शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर ‘सुवर्णमध्य’ काढावा, अशी मागणी करीत ट्रकमालकांनी डिचोलीच्या (Bicholim) उपजिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. डिचोली ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम (सतीश) गावकर आणि सरचिटणीस सुभाष किनळकर यांच्या नेतृत्वाखाली ट्रक मालकांच्या शिष्टमंडळाने आज (बुधवारी) डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

आंदोलनप्रश्नी ट्रकमालकांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ट्रकमालकांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. शेतकऱ्यांच्या (Farmer) आंदोलनप्रश्नी तोडगा निघून खनिज वाहतूक सुरू झाली नाही, तर ट्रकमालकांच्या अडचणी वाढणार, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणणे आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्री ट्रकमालकांची कंपनी व्यवस्थापना बरोबर बैठकही झाली होती. या बैठकीतही ट्रकमालकांनी आपली बाजू व्यवस्थापनासमोर मांडल्याचे खात्रीलायक माहिती आहे.

राजाराम गावकर. अध्यक्ष, ट्रकमालक संघटना

खाणबंदी काळापासून गेल्या जवळपास १२ वर्षांपासून ट्रकमालक आर्थिक संकटात अडकलेले आहेत. बारा वर्षांपासून ट्रकमालक आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. ट्रकमालकांच्या डोक्यावर आर्थिक ओझे आहे. केवळ ट्रकमालकच नव्हेत. तर खाण अवलंबीत घटक संकटात आहेत. या संकटातून सुटका व्हायची असल्यास खनिज व्यवसाय सुरळीतपणे सुरू होणे काळाची गरज आहे. त्यासाठी सरकारनेही या प्रश्नी लक्ष घालावे.

सुभाष किनळकर, सरचिटणीस, ट्रकमालक संघटना

ट्रकमालक शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायलाच पाहिजेत. त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने सर्वमान्य तोडगा काढावा. सरकारनेही (Government) गंभीर पावले उचलून शेतकऱ्यांचे प्रश्न जाग्यावर घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. यापूर्वीही म्हणजे २०१८ साली ट्रकमालकांनी कामगारांना पाठिंबा देताना जवळपास अडीज महिने ट्रक बंद ठेवले होते. खाणबंदीचा सर्वात मोठा फटका ट्रकमालकांना बसत आहे. शेतकरी आणि जनतेने ट्रकमालकांचाही विचार करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT