Goa petrol Diesel prices Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Prices: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांमध्ये घट, दक्षिण गोव्यातील किंमतीत वाढ

Goa Petrol-Diesel Prices 24 November 2023: चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत, इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम इंधन दरांवर होत असतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Prices 24 November 2023: देशांतर्गत तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोलियम उत्पादनांच्या दरांमध्ये केलेल्या बदलांनुसार गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये 24 नोव्हेंबर रोजी बदल झाले आहेत. पेट्रोल दरात उत्तर गोवा आणि पणजी येथे प्रतीलीटर 0.21 पैशांची घट झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोलचे प्रतीलीटर दर 0.19 पैशांनी वाढले.

डीझेल दरांमध्येही उत्तर गोवा आणि पणजी येथे प्रतीलीटर 0.21 पैशांची घट झाली तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 0.18 पैशांनी वाढ झाली.

देशातील तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोलियम उत्पादनांचे नवीन दर जाहिर केले जात असतात. इस्त्रायल हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींवर प्रचंड दबाव आहे. दरम्यान, इंधनाच्या किमतींवर चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम होत असतो.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.29

Panjim ₹ 97.29

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.85

Panjim ₹ 89.85

South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: चांदीची चमक अन् मंगळाची साथ! 'या' राशीसाठी 2026 ठरणार गेम चेंजर; प्रबळ नशिबासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीत मोठा भूकंप! राघव चड्ढांनी पक्षाला ठोकला रामराम; केजरीवालांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

"मुंबई क्राईम ब्रांचचं नाव वापरुन 61 लाखांची लूट!" मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून करायचा 'डिजिटल अरेस्ट'; अखेर गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील भामट्याला अटक

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

SCROLL FOR NEXT