Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरात घट; जाणून घ्या आजचे दर

जागतिक पातळीवरील क्रुडच्या दरांवरून तेलकंपन्या इंधन दरात बदल करत असतात

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये सोमवारी, २४ एप्रिल रोजी घट दिसून आली. उत्तर गोवा, पणजीसह दक्षिण गोवा अशा सर्व ठिकाणी ही घट झाली आहे.

उत्तर गोवा आणि पणजीचा विचार करता रविवारच्या दरांच्या तुलनेत पेट्रोल दरात प्रतीलीटर 0.33 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरात 0.30 पैशांची घट झाली.

डिझेल दरांमध्येही घट झाली आहे. उत्तर गोवा आणि राजधानी पणजी येथे डिझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये रविवारच्या तुलनेत 0.33 पैशांची घट झाली तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये प्रतीलीटर 0.29 पैशांची घट झाली.

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.62

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT