Goa Assembly Session | Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: पेडणेतील अबकारी घोटाळाप्रकरणी श्‍वेतपत्रिका काढा- सरदेसाई

अबकारी खात्याने पार्ट्यांना दिलेल्या परवान्यांची चौकशी करणार : मुख्यमंत्री

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयातील घोटाळ्याचे प्रकरण आज विधानसभेत गाजले. पेडणे तालुक्यात पाच वर्षांत किती पार्ट्यांना परवानगी दिली आणि किती शुल्क आकारले, त्यातून झालेल्या भ्रष्टाचाराची ऑडिट सेलअंतर्गत चौकशी केली जाईल.

जर त्यात खरोखरच घोटाळा झाला असेल तर तीही रक्कम वसूल केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. अबकारी खात्याचा महसूल ३३.१६ टक्क्यांनी वाढला आहे. आता खात्यातर्फे परवाना देण्यास विलंब होत नाही, असे सावंत म्हणाले.

किती पार्ट्यांना मंजुरी दिली, ते तपासा!

अबकारी खात्यातील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी श्वेतपत्रिका काढावी, तसेच ती या अधिवेशन काळातच यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय सरदेसाई यांनी केली. या घोटाळ्यात सहा अबकारी निरीक्षकांचा सहभाग होता.

पहिल्या आणि शेवटच्या निरीक्षकांना निलंबित केले. मधील चारजणांना कारणे दाखवा नोटीस बजावली. जो कारकून आहे, त्याला निलंबित केले; पण त्याचा जबाबच घेतला नाही.

मागील पाच वर्षांत उपजिल्हाधिकाऱ्यांनी पेडणे तालुक्यात किती पार्ट्यांना मंजुरी दिली, हे तपासावे. त्यातून किती महसूल खात्याला मिळाला, ते समजून येईल. परंतु हा कोट्यवधींचा घोटाळा आहे, असे सरदेसाई म्हणाले.

...तर खरा सूत्रधार पुढे आला असता : पेडण्यातील अबकारी खात्यात कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणानंतर संबंधित कारकुनावर निलंबनाची कारवाई केली; पण खऱ्या अर्थाने त्याच्याविरोधात पोलिस तक्रार झाली असती आणि त्याला अटक झाली असती, तर त्या प्रकरणातील खरा सूत्रधार कोण हे समजले असते, असे काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले.

पावसाळी अधिवेशनात मागण्या आणि कपात सूचना या विषयावर ते बोलत होते. अबकारी खाते महालेखापालांनी (कॅग) दिलेल्या अहवालाची गंभीरपणे दखल घेत नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT