मुरगाव तालुका भाजप गटाध्यक्ष पत्रकार परिषदेत उपस्थित तालुक्यातील गटाध्यक्ष (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: केजरीवालांच्या 'फेकू' आश्वासनांवर जनतेचा विश्वास नाही

केजरीवालांच्या आश्वासनांवर मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर यांची प्रतिक्रिया

Dainik Gomantak

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) यांनी गोवावासियांना कागदावरची आमिषे दाखवून एकाप्रकारे जनतेला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 1961 पासून गोव्यातील जनता (Goa Citizen) शिक्षित असून असल्या फेकू आश्वासनावर आमची जनता कदापि विश्वास ठेवणार नाही. केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या आश्वासनाचे आम्ही खंडन करीत असल्याची माहिती राज्य आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा मुरगाव भारतीय जनता पक्षाचे गटाध्यक्ष संजय वसंत सातार्डेकर (Mormugao BJP Group President Sanjay Satardekar) यांनी दिली.

दाबोळी येथे आयोजित मुरगाव तालुका भाजप गटाध्यक्षाच्या पत्रकार परिषदेत वरील माहिती सातार्डेकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत वास्को भाजप गटाध्यक्ष तथा कदंब वाहतूक मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सुद, कुठ्ठाळी भाजप गटाध्यक्ष तथा साकवाळचे पंच नारायण नाईक उपस्थित होते. पुढे माहिती देताना सातार्डेकर म्हणाले की केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या योजना म्हणजे जुमला आश्वासन आहे. १९६१ पासून अनेक पक्षांनी गोव्यात सत्ता चालविली. पण केजरीवाल यांनी जाहीर केलेली आश्वासने आज पर्यंत एकाही राजकीय पक्षांनी आमच्या राज्यात जनतेला दाखवलेली नाही. असल्या जाहीर नाम्याना फेकू आश्वासने संबोधले जाते. भाजप सरकारने गोव्यात विविध योजना बरोबर विकासाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केलेली आहे. गोवा योग्य दिशेने प्रगती करीत असून केजरीवाल यांनी दिल्लीची स्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करावा. दिल्लीतील स्थिती सर्वांना माहीत असून सर्वप्रथम त्याने दिल्लीचे सरकार योग्य पातळीवर नेण्यास पुढाकार घ्यावा. नंतर इतर राज्यात जाऊन आश्वासने द्यावी अशी माहिती मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी दिली.

दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गोव्यात बेकारी भत्ता देण्याचे जाहीर करून केजरीवाल यांनी मोठी चूक केली आहे. सर्वप्रथम केजरीवाल यांनी गोव्याची आर्थिक स्थिती जाणून घेणे गरजेचे होते. प्रत्येक घरात सरकारी नोकरी देणार असे जाहीर करून एकाप्रकारे गोव्यातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक केलेली आहे. रेल्वे दुपदरी मार्गाला आम आदमी पक्षाचे पदाधिकारी विरोध करून गोव्याच्या अर्थव्यवस्थेला अडथळा निर्माण करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत लवकरच खाण, पर्यटन व्यवसायाला यशस्वीरित्या पुढे नेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक यांनी सांगितले की केजरीवाल यांचा पक्ष ज्या जागेवर कधी पोचणार नाही, त्याची स्वप्ने पाहु नये. तसेच जूमला आश्वासने गोव्यातील जनतेला देऊ नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील युवकांना सहा हजार नोकर्‍या दिल्या आहेत. दिल्लीत भ्रष्टाचार करून त्याने गोव्यात कडधान्य वाटप केले आहे. कोविड महामारी वेळी एकाही आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जनतेला कडधान्य पुरवण्यासाठी पुढाकार घेतला का नाही. गोवा सरकारने कोरोना विषाणू मुळे मृत्यू पोहोचलेल्यांच्या प्रत्येक कुंटूबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिलेली आहे. तसेच भाजप पक्षाने ओवाळून टाकलेल्या नेत्यांना घेऊन आप ने आपली पक्षनीती जनतेला दाखवलेली आहे. केजरीवाल यांनी गोव्यात वेश्याव्यवसाय व अमली पदार्थावर नियंत्रण ठेवण्यास भाजप व काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरले होते असा आरोप केला होता. सर्वप्रथम केजरीवाल यांनी गोव्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे होते. १६ वर्षापुर्वी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी बायणातील वेश्यावस्ती जमीनदोस्त केली होती. याची माहिती कदाचित केजरीवाल यांना त्यांच्या गोव्यातील पदाधिकाऱ्यांनी दिली नसावी. उगाच गोव्यावर केजरीवाल याने बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे असा इशारा वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक यांनी दिला.

कुठ्ठाळी भाजप गटाध्यक्ष नारायण नाईक यांनी सांगितले की निवडणूक जवळ आल्याने आळंबी सारखे पक्ष गोव्यात येऊ लागले आहे. २०१९ मध्ये केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आठ हजार नोकर्‍या देणार असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात यातील ३० टक्के सुद्धा नोकऱ्या दिल्लीतील जनतेला आजपर्यंत मिळालेल्या नाही. संपूर्ण देशात खोटी आश्वासने देणारा एकमेव मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जगप्रसिद्ध आहे. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण करून दाखवलेली आहे. गोवा वासीय शिक्षित असून केजरीवाल यांच्या जाहीरनाम्याला स्वीकारणार नाही. येणारी विधानसभा निवडणुकीत भाजपचे २२ पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार आहे. केजरीवाल यांनी दिल्लीचा पैसा विकासावर खर्च करावा उगाच जाहिरातीवर खर्च करू नये असा सल्ला शेवटी नाईक यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

SCROLL FOR NEXT