पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाला (the national highway) ठीक ठिकाणी पडलेले खड्डे (Pits) आजही मृत्यूचा सापळा बनलेला आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: पेडणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा

राष्ट्रीय महामार्गाच्या (national highway) उंची बरोबरच सर्व्हिस रोड केले जाईल. त्याची आज पर्यंत कार्यवाही झाली नाही. अनेक ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज असतानाही त्याची सोय केलेली नाही, अनेक कठडे कोसळून गेले आहेत.

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाला (the national highway) ठीक ठिकाणी पडलेले खड्डे (Pits) आजही मृत्यूचा सापळा बनलेला आहे. धारगळ येथील उड्डाण पुलाला भेगा (Break the bridge) पडलेल्या आहेत आणि सिमेंट लावून लपवण्याचा प्रयत्न ठेकेदार करत आहेत. शिवाय जे सर्विस रस्ते आहेत त्याना जे खड्डे पडलेले आहेत त्यातून दुचाकी वाहने चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे.

अनेक ठिकाणी सर्विस रस्त्यांचा पत्ताच नसल्याने राष्ट्रीय महामार्गावरून क्रॉस करताना अडचणी येत आहेत. उड्डाण पुलांचे काम संशयाच्या घेऱ्यात असून एका बाजूने उड्डाण पूल खेचल्यासारखी वाटतात. कंत्राटदाराच्या कामाविषयी आता संशयाला बळकटी मिळत आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कॉंक्रीट रस्त्यालाच खड्डे पडलेले आहे शिवाय कामही व्यवस्थित झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पेडणे येथील जागृत नागरिक सुर्यकांत चोडणकर यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय महामार्गाचे जे काम चालू आहे. ते काम निकृष्ट पद्धतीने चालू आहे. ज्या ठिकाणी काम सुरु आहे त्या ठिकाणी कुणीच कामावर लक्ष ठेवणारे अधिकारी, पर्यवेक्षक दिसत नाही. त्यामुळे कंत्राटदार मनमानी प्रमाणे काम करत असतो. रस्त्याना पडलेले खड्डे आणि सर्व्हिस रस्त्यांची झालेली दैना पाहता सार्वजनिक रस्ता विभाग अस्तित्वात आहे कि नाही यांची शंका येत असल्याचे सुर्यकांत चोडणकर यांनी सांगितले.

गटार व्यवस्था आणि सर्व्हिस रस्त्ये

राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला पूर्वी जी गटार व्यवस्था होती, त्या व्यवस्थेकडे कंत्राटदाराने गांभीर्याने पाहिलेले नाही. रस्त्याच्या बाजूला आजपर्यत गटार व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात अनेक घरात रस्त्यावरील थेट पाणी शिरले होते. मागच्या २ महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी अधिकाऱ्या सोबत रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळीमंत्र्यानीही गटार व्यवस्था निट करण्याचे आदेश अधिकाऱ्याना दिले होते, त्या आदेशाला पाने पुसण्याचे काम आजपर्यंत कंत्राटदाराने केले.

या रस्त्याच्या बाजूला असलेले गावाला जोडणारे सर्व्हिस रस्त्ये म्हणजे जणू मृत्यूचे सापळे बनले आहे. मागच्या वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर हे लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी पेडणे शाशकीय निवास्थानी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते की राष्ट्रीय महामार्गाच्या उंची बरोबरच सर्व्हिस रोड केले जाईल. त्याची आज पर्यंत कार्यवाही झाली नाही. अनेक ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज असतानाही त्याची सोय केलेली नाही, अनेक कठडे कोसळून गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: भविष्यात गोव्यातील लोकांकडे 'पैसा' असेल, पण स्वत:ची 'जमीन' व 'गोंयकारपण' असणार नाही..

Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

Goa Coconut Price: नारळ महागला! स्थानिक उत्पादन कमी, परराज्यातून आवक; शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी

SCROLL FOR NEXT