Goa Road Acident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Acident: पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात, राज्यात 5 महिन्यांत 26 जणांचा रस्त्यांवर बळी

Pedestrian Deaths Goa: गोव्यात पादचाऱ्यांचे रस्ता अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, ही धोक्याची घंटा असून हे प्रमाण का वाढते याचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत गोवा कॅन या संघटनेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी व्यक्त केले.

Sameer Amunekar

मडगाव: रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सूचना खुद्द सर्वोच्च न्यायालयाने केल्यावर देशभरात पादचाऱ्यांच्या सुरक्षेचे उपाय घेतले जात असले तरी गोव्यात मात्र पादचारी सुरक्षित नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे.

गेल्या पाच महिन्यांत तब्बल २६ पादचाऱ्यांचे रस्ता अपघातात बळी गेले आहेत. देशांत रस्ता अपघातात बळी पडणाऱ्या पादचाऱ्यांचे प्रमाण हे सरासरी १७.९१ टक्के असले तरी गोव्यात हे प्रमाण २१ टक्के एवढे प्रचंड आहे.

एप्रिलपर्यंत गोव्यात १५ पादचाऱ्यांना रस्त्यावर मरण आले होते; पण मागच्या एका महिन्यातच त्यात आठ मृतांची भर पडली असून तो आकडा २३ वर पोहोचला आहे. ही वाढ मागच्या वर्षांच्या तुलनेत २७ टक्के जास्त आहे.

गोव्यात पादचाऱ्यांचे रस्ता अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, ही धोक्याची घंटा असून हे प्रमाण का वाढते याचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत रस्ता अपघातांविषयी संपूर्ण गोव्यात जागृती मोहीम राबवत असलेल्या गोवा कॅन या संघटनेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी व्यक्त केले.

मागच्या २०२४ मध्ये जानेवारी ते मे या पहिल्या चार महिन्यांत १८ पादचाऱ्यांना मृत्यू आला होता. गोव्यात रस्ता ओलांडत असताना बहुतेक पादचाऱ्यांचे मृत्यू झाल्याचे दिसून आलेले आहेत. गोव्यातील रस्ते आता पूर्वीपेक्षा रुंद झाल्याने रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांना जिकिरीचे बनले आहे.

यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांत एकूण ११५ जीवघेणे अपघात राज्यात घडले असून त्यात ११८ लोकांचा जीव गेला. त्यात ७१ दुचाकीचालक, १५ दुचाकीच्या मागे बसलेले, २३ पादचारी, तीन अन्य वाहनचालक तर सहा प्रवाशांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपूर्ण देशात पादचारी आणि सायकलस्वार यांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा बनला असून गोव्यानेही आता या गोष्टीकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. गोव्यात पादचाऱ्यांचे मृत्यू ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.

फक्त हेल्मेट आणि सीट बेल्टपुरती जागृती करून चालणार नाही तर पादचारी सुरक्षा कशी साधता येईल, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पादचाऱ्यांच्या प्रत्येक अपघाताची कारणमीमांसा आता त्यासाठी करावी लागेल. - रोलंड मार्टिन्स, निमंत्रक, गोवा कॅन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT