Goa Traffic Issue: गोव्यात वाढत्या गुन्हेगारीप्रमाणेच अपघातांचे आणि वाहन कोंडीचे प्रकार हल्ली सर्रास होत असून सध्य राजधानी पणजीत आठवडाभर नियमित वाहतूक कोंडी वाहनचालकांना अनुभवायला मिळत आहे.
सध्या कला अकादमी येथील दर्यासंगम येथे लोकोत्सव सुरु असून नजीकच्या कंपाल ग्राउंडवर अॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे.
आज वीक एन्ड आणि त्यातच हे दोन्ही फेस्टिवल सुरु असल्याने मिरामार रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दीवजा सर्कल ते मिरामार सर्कल पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
शनिवारी रात्री अंदाजे 7 वाजल्यापासून वाहन कोंडी झाली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पासाठी शहरात खोदलेले रस्ते हेही वाहतूक कोंडीचे महत्वाचे कारण बनले आहेत.
पुढचे काही दिवस गोव्यात कार्निवल, शिगमोत्सवाची धूम असून याही काळात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.
वाहनचालकांनी गरजेव्यतिरिक्त चारचाकी घेऊन न बाहेर पडता दुचाकी घेऊन प्रवास करावा जेणेकरून वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकेल असे सांगण्यात येतेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.