Water Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Water Issue: रायबंदर येथे जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

Goa Water Issue: स्मार्ट सिटी कामात अडथळा

Ganeshprasad Gogate

Goa Water Issue: मागील काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत राजधानी पणजीत रस्ते बांधकाम सुरु असून सुट्टीच्या दिवशी वाहतूक कमी असल्याने कामांची गती वाढल्याचे दिसून आलेय.

शनिवार - रविवार या दिवशीही कामे करताना कर्मचारी दिसत होते. सांतिनेज आणि लगतच्या परिसरात सध्या रस्ता निर्मितीच्या कामाने जोर धरला आहे.

रायबंदर येथे शनिवारी स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना परिसरात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामात तर अडथळा आलाच शिवाय हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याचे दिसून आले.

पणजी शहराचा एक भाग असलेल्या राबंदर परिसरातही स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. शहरापासून जरा विलिप्त असलेल्या या भागातील समस्यांचा अलीकडे आता परिणाम जाणवू लागला आहे.

वाहतूक व्यवस्था वळविल्याने जुनेगोव्याकडून पणजीला येणाऱ्यांना आणि पणजीतून रायबंदरमार्गे इतरत्र जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

स्मार्ट सिटीची कामे रायबंदर परिसरात सुरू झाली असून, येथील अरुंद रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करीत ही कामे करावी लागत आहेत.

खोदकाम करताना रायबंदर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती लागल्याने खोदकाम केलेला खड्डा पाण्याने भरून गेला.

त्याशिवाय खड्डा भरून रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कळविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

SCROLL FOR NEXT