Air Quality In Panjim
Air Quality In Panjim Dainik Gomantak
गोवा

Air Quality In Panjim: स्मार्टसिटीवर धुक्याची नव्हे तर प्रदूषणाची चादर, हवामान सुधारात पणजी पिछाडीवर!

गोमन्तक डिजिटल टीम

Air Quality In Panjim पणजीत ऊर्जेचा जास्त वापर वाहतूक क्षेत्रात होतो. त्यासाठी 64.8 टक्के हे इंधन कार्बन उत्सर्जन करणारे वापरले जाते. त्यामुळे हवामान सुधारासाठी प्रयत्न करणाऱ्या शहरात पणजी शहर मागे पडले आहे.

हवामान सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नात देशात सर्वेक्षण केलेल्या १५ शहरांमध्ये राजधानी पणजी हे शहर मागे पडले आहे. पणजी शहराची कामगिरी यादृष्टीने वाईट झाली आहे. क्लायमेट सेंटर फॉर सिटीज आणि आयएलईआय दक्षिण आशियाने याबाबतचा अहवाल केला आहे.

त्यामध्ये पणजीला केवळ दोन स्टार रेटिंग देण्यात आले आहे. याचा अर्थ पणजी शहराला त्यात खूप सुधारणा करणे आवश्यक आहे. याचे सर्वात मोठे कारण आहे, पणजीतील वाहतूकीत सर्वाधिक इंधन ऊर्जेचा वापर होतो. येथे 64.8 टक्के कार्बन इंधन वापरले जाते.

एकेकाळी पणजीतील वाहतूक सुधारण्यासाठी मोनोरेलचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला होता. त्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर विजेवर चालणारी वाहने पणजीत असतील, असे सांगण्यात येत होते.

पणजीत भेट देणाऱ्यांना भाडे तत्त्वावर विजेवर चालणाऱ्या सायकलीही भाड्याने मिळण्याची सुविधा देण्यात आली होती. नंतर ती गुंडाळण्यात आली. पणजीतील वाहतूक सुधाराकडे सरकारी पातळीवर कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. याचा परिणाम म्हणून पणजीची ही स्थिती झाल्याचे दिसून येते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार या १५ शहरांमध्ये पणजीमध्ये दरडोई ऊर्जा वापर, दरडोई वीज वापर आणि दरडोई हरितगृह वायूंचे उत्सर्जन या माहितीचे एकत्रित विश्लेषण केले गेले. पणजीसाठी हवामान कृती आराखडा आवश्यक आहे.

कारण हे शहर किनारपट्टीवर आहे. रुह द ओरेम खाडी, सांत इनेज खाडी, मांडवी आणि झुआरी नदीमधील बॅकवॉटरवरील खारफुटीचे जतन, संवर्धन गरजेचे आहे. अन्यथा या हवामान बदलाची मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असे अहवालात म्हटले आहे.

पर्यटनाची शाश्वत पद्धत, अक्षय ऊर्जा स्रोतांना प्राधान्य, महत्त्वाच्या परिसंस्थांचे जतन, हवामानास अनुकूल कृषी तंत्रांचा अवलंब करणे, ही आवश्यक पावले त्यासाठी उचलणे गरजेचे आहे.

या अभ्यासात अहमदाबाद, कोईम्बतूर, ग्वाल्हेर, कोची, नागपूर, पिंपरी चिंचवड, राजकोट, शिमला, सिलीगुडी, ठाणे, तिरुचिरापल्ली, तिरुनेलवेली, उदयपूर आणि वडोदरा या शहरांचाही समावेश आहे.

तातडीची कारवाई हवी!

जलद नागरीकरण, कचरानिर्मिती, ऊर्जावापर यातून ही गजबजलेली केंद्रे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जनाचे केंद्र बनली आहेत. लोकसंख्या वाढते, तसा संसाधनांवर ताण येतो, त्यातून पर्यावरणीय समस्या आणि हवामान बदल वाढतात, असेही अहवालात म्हटले आहे.

पर्यावरणपूरक धोरणांचा स्वीकार करण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे. तरच शहरी झगमगाट आटोक्यात आणून हिरव्यागार, अधिक लवचीक भविष्यासाठी मार्ग तयार करता येईल, असे अहवालात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT