Panjim Municipality Dainik Gomantak
गोवा

Panjim Municipality: रस्त्यांची दुर्दशा, पथदिवे बंद; 'स्मार्ट सिटी'तील 'हा' परिसर कधी स्मार्ट होणार?

'मनपा'ची केवळ महसुलावर नजर

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Municipality आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) विकसित केलेला पाटो परिसर महानगरपालिकेकडे हस्तांतर केल्यानंतर याठिकाणी ज्या सुविधा निर्माण करायला हव्या होत्या, त्या निर्माण करण्यात महानगरपालिकेला अपयश आले आहे.

सध्या या परिसरात रस्त्यांची स्थिती बिकट तर आहेच पण रात्रीच्यावेळी अनेक ठिकाणचे पथदिवेही बंद असल्याने या राजधानीतील हा विकसित झालेला हाचा काय तो परिसर? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

ईडीसीने पाटो परिसरात सर्व कार्पोरट कार्यालये येतील, यादृष्टीने हा भाग विकसित केला. त्यामुळे याठिकाणी अनेक व्यावसायिकांनी इमारती उभारल्या, अनेक कार्यालये तेथे आली, त्याशिवाय सरकारी कार्यालये खासगी इमारतींमध्ये भाड्यापोटी हस्तांतरीत झाली.

ईडीसीकडे या परिसराची देखरेख असल्याने त्याठिकाणी सुविधा निर्माण करणे किंवा निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याची जबाबदारी होती. परंतु काही वर्षांपूर्वीच हा परिसर महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाला. त्यामुळे महानगरपालिकेला या परिसरात असणाऱ्या खासगी कार्पोरेट कार्यालयांकडून चांगला महसूल मिळू लागला.

महानगरपालिकेकडून या ठिकाणी हव्या त्या सुविधा निर्माण करण्यावर भर देणे आवश्‍यक होते, पण तसे झाले नाही. विशेष बाब म्हणजे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडलाही याठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करता आल्या असत्या, पण त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले.

या परिसरालाच लागून कदंबा बसस्थानक आहे, त्याशिवाय खासगी बसेस थांबाही वाहतूक खात्याच्या जागेवर आहे. त्यामुळे लोकांची गर्दी असते.

पार्किंग शुल्क मिळते; पण सुविधांची वानवा ! : महानगरपालिकेकडून केवळ येथे फारफार तर रस्ते साफसफाई आणि पार्किंग शुल्क आकारणीचे काम होते. परंतु ज्या सुविधा निर्माण व्हायला हव्या होत्या, त्या होताना दिसत नाहीत. पाटो परिसर सत्ताधारी नगरसेवकाच्या हद्दीत येतो. त्यामुळे या परिसराकडे ज्या पद्धतीने कामे व्हायला हवी होती, ती झालेली नाहीत.

खड्डा बुजवला;पण त्यावर डांबरच नाही !

संस्कृती भवनासमोरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याठिकाणी एका मोठ्या इमारतीच्या कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्याशिवाय मलनिस्सारण वाहिनीसाठी तिथे खोदकाम केल्यानंतर तो खड्डा भरला खरा, पण त्यावर डांबर काही टाकले गेले नाही.

पावसात या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे दुचाकीस्वारांसाठी धोक्याचेच होते. पण आता धुळीचा त्रास या रस्त्यावरून येजा करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. नव्या पाटो पुलावरून कदंबा बसस्थानकाकडे ये-जा करण्‍यासाठीचा असणाऱ्या मार्गाचीही दुरवस्था झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT