Food Court Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: एका जागी डेकोरेशन तर दुसऱ्या जागेचा ठराव; पणजीत फूड कोर्ट नक्की कुठे?

सुशोभीकरणाचे काम: विक्रीचे गाडे घालण्यास मिळणार कधी?

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City: स्मार्ट सिटीची कामे सुरू होणार म्हणून मिरामार येथील खाद्य पदार्थ विक्रीची गाडे हटविण्यात आले. तर मार्च 2020 मध्ये महानगरपालिकेने अन्न व औषध प्राधिकरणाची (एफडीए) परवानगी न घेतल्याने शहरातील 80 गाड्यांवर कारवाई केली होती.

त्यानंतर पाटो येथे फूड कोर्ट करण्याचा ठरावही झाला, मिरामार येथील जागेचे सुशोभिकरणही झाले आहे. त्यामुळे आता फूड कोर्ट नक्की होणार तरी कुठे? असा प्रश्‍न गाडेधारकांनाही आहे आणि नागरिकांनाही आहे.

सायंकाळच्यावेळी मिरामार किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी जाणारे किंवा तेथे येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील गाडेधारकांना ग्राहक चांगल्या प्रकारे मिळत होता. परंतु त्यातील अनेकजणांकडे एफडीएचा परवानाच नव्हता.

महानगरपालिकेचे गाडे क्रमांक मिळूनसुद्धा एफडीएचे प्रमाणपत्र घेण्यात गाडेधारकांनी स्वारस्य दाखविले नव्हते. त्याशिवाय डॉन बॉस्को जवळील पार्किंगच्या जागी गाडे उभे करण्यास संधी मिळाली, परंतु त्या गाडेधारकांकडून स्वच्छता पाळली नाही. त्यामुळेच तत्कालीन महापौर उदय मडकईकर यांनी शहरातील गाड्यांवर कारवाई केली होती.

गाडे बंद झाल्यानंतर अनेकांनी येऊन व्यवसाय करण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी महापौर रोहित मोन्सेरात यांना भेटून केली आहे. परंतु अद्यापि फूड कोर्टची निश्‍चिती न झाल्याने हा प्रश्‍न थिजत पडलेला आहे.

जागा कधी ठरणार?

महानगरपालिकेने फूड कोर्ट पाटो येथील निर्माण होत असलेल्या जैवविविध उद्यानाजवळ करावा, म्हणून ठरावही मंजूर केला होता. त्या ठरावानंतर पुढे काहीच प्रक्रिया झाली नाही किंवा तो विषयही चर्चेसाठी आलेला नाही.

त्यामुळे आता शहरातील प्रस्तावित फूड कोर्ट होणार तरी कुठे हा प्रश्‍न या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्यांना नक्कीच पडत असणार आहे. परंतु नव्याने सुशोभित झालेल्या मिरामार किनाऱ्यावर पुन्हा फूड कोर्ट स्थापित केला जाणार की नाही, हे मात्र अद्यापि गुलदस्त्यातच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

SCROLL FOR NEXT