Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा हद्दीत कर्नाटकी ट्रॉलर्सकडून बुलट्रॉलिंग!

Goa News: एलईडी मासेमारीचा विषय गाजत असताना कर्नाटकातील ट्रॉलर येऊन गोव्याच्या समुद्रात बुलट्रॉलिंग केले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: एलईडी मासेमारीचा विषय गाजत असताना कर्नाटकातील ट्रॉलर येऊन गोव्याच्या समुद्रात बुलट्रॉलिंग केले जात आहे. गेले सुमारे 15 दिवस हा प्रकार सुरू असून मत्स्योद्योग खात्याला सूचना देण्यात आली होती. परंतु कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावा मांडवी मासेमारी सोसायटीचे अध्यक्ष फ्रान्सिस डिसोझा यांनी केला आहे. मालीम जेटी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

समुद्रात सुरवातीला मोठ्या संख्येत बांगडे उपलब्ध होत असल्याने लहान ट्रॉलर तेथे मासेमारी करत होते, त्यामुळे सध्या मोठ्या संख्येत बांगडे मिळत आहेत. ट्रॉलर 500 बॉक्स येतात, परंतु ते खरेदी करण्याची क्षमता दलालांकडे नाही. त्यात आज आलेले मासे दुसऱ्या दिवशी खेरदी केले जात असल्याने त्यातील 100 बॉक्स ताजे राहतात, इतर 400 बॉक्स खराब होत आहेत, अशी खंत डिसोझा यांनी व्यक्त केली.

मोठ्या प्रमाणात बांगडे खराब होत असल्याने त्यांची दुर्गंधी सध्या मालीम जेटीवर परसली आहे. यासंदर्भात मत्स्योद्योग मंत्री, मत्स्योद्योग खाते आणि जेटी निबंधक यांना पत्र पाठवून ते हटवण्याची मागणी केली आहे.परंतु आजपर्यंत कोणीही येऊन साधी पाहणीही केलेली नाही. किमान खराब झालेल्या मासळीची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे, असे डिसोझा यांनी सांगितले.

कोणावरही बळजबरी केली नाही: डिसोझा

मांडवी (Mandvi) मासेमारी सोसायटीमध्ये सदस्य नसलेल्यांना आपले दोन ट्रॉलर मालीम जेटीवर लावण्याची परवानगी आहे. परंतु अविनाश शिंदे यांनी तीन ट्रॉलर आणले होते. तिसऱ्याला परवानगी नाकारल्यावर त्यांनी गौरीश साळगावकर यांच्या नावे ट्रॉलर दाखवला. मात्र, त्याची हाताळणी शिंदेकडून होत असल्याने याची तक्रार पोलिसांत केली होती.

प्रकरण उच्च न्यायालयात (High Court) पोहोचल्यानंतर न्यायालयाने ट्रॉलरला पाणी आणि डिझेल भरण्याची सुविधा देण्याचा आदेश दिला होता. त्याचे पालन केले असून आम्ही कोणावरही बळजबरी केली नाही, असे फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काल शिंदे प्रकरणाचा हवाला देऊन मांडवी मासेमारी सोसायटीकडून बळजबरी होत असल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT