Goa Water Bill Hike
Goa Water Bill Hike Dainik Gomantak
गोवा

Goa Water Bill Hike: रहिवासी संकुलांचा सरकारवर जोरदार 'हल्लाबोल'

दैनिक गोमन्तक

Goa Water Bill Hike: सार्वजनिक बांधकाम खात्याने पाणी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आयते कोलीत हाती मिळालेल्या विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वस्तुत: या दरवाढीचा फटका घरांऐवजी मोठ्या रहिवासी संकुलांना बसणार आहे. पाच टक्क्यांप्रमाणे लीटरमागे अंदाजे 17 पैसे वाढ होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक कुटुंबाला 16 हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, पाणी दरवाढ करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

असे असले, तरी मोफत पाण्याची मर्यादा संपल्यानंतरच नवीन शुल्क लागू होणार असल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले आहे. प्रत्यक्षात घरांऐवजी मोठ्या रहिवासी संकुलांना पाणी दरवाढीचा फटका बसणार आहे. कारण प्रत्येक घराला 16 हजार लिटर पाणी मोफत मिळते.

परंतु मोठ्या अपार्टमेंट, रहिवासी संकुलांना पाण्याची एकच जोडणी असल्याने संपूर्ण संकुलासाठी मिळून 16 हजार लिटर पाणी मोफत मिळते. 200 फ्लॅट असलेल्या मोठ्या संकुलालाही तेवढेच पाणी मिळणार आहे.

दरवर्षी 5 टक्के दरवाढीची तरतूद

12 मे 2020 रोजी सरकारने अखेरची पाणी दरवाढ केली होती. त्यानंतर कोरोना महामारीमुळे दरवाढ केली नव्हती. आता थेट अडीच वर्षांनंतर दरवाढ केली आहे. वस्तुत: प्रत्येक वर्षी 5 टक्के दरवाढ करण्याची कायद्यातच तरतूद आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय हा काही नव्याने घेतलेला नाही, अशी माहिती साबांखाचे सांतिनेज कार्यालयातील साहाय्यक अभियंता दिगंबर नाईक यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

नोव्हेंबरमध्ये वाढीव शुल्कानुसार बिल

पाणी दरवाढीचा निर्णय घेतल्यानंतर लीटरमागे अंदाजे 17 पैसे दरवाढ होईल. सध्या लीटरमागे 3.50 रुपये शुल्क आहे. ते वाढून अंदाजे 3.67 रुपये होणार आहे. यासंदर्भात अद्याप सरकारकडून अधिसूचना आलेली नाही. मात्र, लवकरच ती येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचे बिल नवीन शुल्कानुसार असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dam Water : धरणांत पाणी पातळी घटली; सरासरी २ मीटरने जलसाठ्यात घट

Kadamba News : ‘कदंब’चे ‘ते’ कर्मचारी रडारवरच; वन खात्याकडून सखोल तपास सुरू

Konkan Railway : ‘कोकण रेल्‍वे’ करणार केनियाच्‍या रेल्‍वेची कामे : संतोष कुमार झा

Mapusa News : आता सीसीटीव्हींसह रखवालदार गरजेचेच; पोलिस आणि नागरिकांमध्ये हवा समन्वय

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

SCROLL FOR NEXT