Art Exhibition in Goa | Rohan Khaunte
Art Exhibition in Goa | Rohan Khaunte Dainikg Gomantak
गोवा

Art Exhibition in Goa: गोमंतकीय सिद्धहस्त चित्रकार गोविंद सिलिमखानांच्या प्रदर्शनाला रोहन खंवटेंची भरभरुन दाद

दैनिक गोमन्तक

Art Exhibition in Goa: एका वर्षात जलरंग चित्रकृतींचे शतक पार केलेले गोमंतकीय सिद्धहस्त चित्रकार गोविंद सिलिमखान यांच्या, कला संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने संस्कृती भवनाच्या कला दालनात आयोजित जलरंग चित्रप्रदर्शनाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

आज निसर्ग, वारसास्थळे उद्‍ध्वस्त होत आहेत, ती चित्ररुपात तरी संवर्धित व्हावीत, असे चित्रकाराला वाटतेय. जलरंग चित्रांमधून गोव्यातील निसर्गस्थळे, वारसास्थळे यांची सौंदर्यानुभूती देणारे हे चित्रप्रदर्शन पाहताना मन प्रसन्न होते.

निसर्ग कुशीत विसावलेली घरे, गावातील निमुळते रस्ते, हिरवीगार शेतें, कवळेंची श्री शांतादुर्गा व नागेशीचे श्री नागेशी मंदिरे, रेईश मागूश किल्ला, हळदोणे चर्च, रायबंदरचा भाग, मोर्लेचा निसर्गरम्य परिसर, वझरी (पेडणे) भागात वाळू उपसा करणारी होडी, पणजीतील वैद्यकीय महाविद्यालयाची जुनी इमारत, पीपल्स हायस्कूलची जुनी इमारत, फोफळीच्या बागायतीत विसावलेले घर अशा 56 जलरंग चित्रकृती प्रदर्शनात आहेत.

सगुण वेळीप म्हणाले की, रसिकांसमोर एखादी कला जाते, त्यावेळी त्या कलेचे माेल कळते. कला संस्कृती संचालनालय कलाकारांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असते. गोविंद सिलिमखान यांचे जलरंग माध्यमावरील अप्रतिम प्रेम, शैलीचे वेगळेपण, या शैली मिळविलेले प्रभुत्व हा प्रवास अपूर्व असाच आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते आणि कला संस्कृती संचालक सगुण वेळीप व उपसंचालक अशोक परब, प्रसिद्ध जलरंग चित्रकार तथा इंटरनॅशनल वॉटर कलर्स सोसायटीचे गोवा प्रमुख कालिदास सातार्डेकर व गोविंद सिलीमखान यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले व 23 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते संध्या. 7 पर्यंत रसिकांसाठी ते खुले असेल. शिवानी शेट्ये, दीक्षा शेट्ये, कामाक्षी पै धुंगट यांनी मान्यवरांचा सन्मान केला. नागेशराव सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

रोहन खंवटे-

कलेला आज प्रतिष्ठा मिळाली आहे. गोविंद सिलिमखान यांची चित्रे रसिकांना आनंद देतात. कारण त्यातील भाव दर्शन प्रभावित करते. कलाकाराच्या अभिव्यक्तीतूनच कलाकाराची ओळख निर्माण होत असते. सिलिमखानला बालपणापासून ओळखतो, पण चित्रकार म्हणून त्यांनी मारलेली मजल थक्क करणारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT