Vote  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchyat Byelection : 3 पंचायतींच्या पोटनिवडणूकीत सरासरी 72.46 टक्के मतदान

मतदानाचा हक्क बजावण्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे तालुक्यातील पार्से (Parcem), तिसवाडी तालुक्यातील सांत इस्तेव्ह (St. Estevam)आणि सासष्टी तालुक्यातील धर्मापूर (Dramapur) या राज्यातील तीन पंचायतींच्या प्रत्येकी एका प्रभागासाठी आज पोटनिवडणूकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर सोमवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

या पोटनिवडणूकीच्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. तीन प्रभागांमध्ये 72.50 टक्के मतदान झाले. या तिन्ही पंचायतीमध्ये एकूण 1691 मतदारांपैकी 1226 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

तीन्ही पंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू होते. पाऊस असूनही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. 818 पुरुष मतदारांपैकी 573 पुरुष मतदारांनी तर 873 महिला मतदारांपैकी 653 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूणच या आकडेवारीतून मतदानाचा हक्क बजावण्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.

सांत इस्तेव्ह (St. Estevam) पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये 71.31 टक्के मतदान झाले तर धर्मापूर (Dramapur) पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 60.91 टक्के मतदान झाले. पार्से पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये 85.16 टक्के मतदान झाले. धर्मापूर पंचायतीत सर्वाधिक कमी तर पार्से पंचायतीत सर्वाधिक मतदान झाल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT