Goa panchayat staff salary hike demand Ai Generator Image
गोवा

Goa Government Employees: 18 वर्षे वेतन आयोग बदललाच नाही! सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचाऱ्यांचा डिसेंबरपासून एल्गार

Goa Panchayat Workers Seventh Pay Commission: गेल्या १८ वर्षांपासून सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्या १८ वर्षांपासून सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल गोवा पंचायत वर्कर्स युनियनने (आयटक संलग्न) डिसेंबरपासून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या वार्षिक सभेत करण्यात आला.

पणजी येथील इन्स्टिट्यूट पिएदाद सभागृहात ‘आयटक’चे उपमहासचिव ॲड. राजू मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सरचिटणीस संतोष नाईक यांनी वार्षिक अहवाल सादर केला. पंचायत कर्मचाऱ्यांचा कर्मचारी आकृतिबंध १९९६ पासून बदललेला नाही. ग्रामपंचायतींच्या कामकाजात वाढ झाली असतानाही कर्मचारी संख्या आणि पदरचनेत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे.

सातवा वेतन आयोग लागू करणे, कर्मचारी आकृतिबंधात सुधारणा करणे, तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करणे, थकीत वेतन आणि निवृत्तिवेतनाचे प्रश्न सोडविणे या मागण्या संघटनेने मांडल्या आहेत. सभेला ख्रिस्तोफर फोन्सेका, प्रसन्न उटगी उपस्थित होते. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रदीप गावस, उपाध्यक्षपदी प्रीतम फडते व अनिल नाईक, तर सरचिटणीसपदी मोहन सामंत यांची निवड झाली. संतोष नाईक यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

Cyber Fraud Safety Tip: दिवाळीत शॉपिंग करताना सावधान! 80 टक्के डिस्काउंटच्या नावाखाली सायबर भामटे घालू शकतात गंडा, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT