Goa Village Panchayat DainikGomantak
गोवा

Panchayat Goa: कधी देणार आमचे मानधन? पाच महिन्यांपासून गोव्यातील पंचायत सदस्य प्रतीक्षेत, खर्च भागवणे झाले मुश्किल

Goa Village Panchayat: २०२४च्या सुरुवातीच्या महिन्यांची देयके समाविष्ट करून शेवटचे मानधन वितरण जुलैमध्ये झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: राज्यभरातील पंचायत सदस्यांचे मानधन गेल्या पाच महिन्यांपासून देणे बाकी असल्याने पंचायत सदस्यांवर आर्थिक ताण पडत आहे. विलंबामुळे त्यांना खर्च भागवण्यासाठी, विशेषतः सणासुदीच्या काळात संघर्ष करावा लागत आहे.

२०२४च्या सुरुवातीच्या महिन्यांची देयके समाविष्ट करून शेवटचे मानधन वितरण जुलैमध्ये झाले होते. पंचायत सदस्यांना ४,५०० रुपये मासिक मानधन मिळते, तर सरपंचांना ६,००० रुपये मिळतात.

‘या विलंबामुळे तळागाळातील प्रशासनाकडे गंभीरपणे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला शेवटची देयके मिळाल्यापासून पाच महिने झाले आहेत आणि यामुळे आमचा ख्रिसमसचा उत्साह कमी झाला आहे’, असे राशोलचे सरपंच आणि ऑल गोवा पंचायत डेमोक्रॅटिक फोरमचे सरचिटणीस जोसेफ वाझ यांनी सांगितले.

पंचायती आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या गरजांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी मानधनात सुधारणा करण्याचे आश्वासन देऊनही कोणतीही प्रगती झालेली नाही.

मानधनात प्रतिसभासद दोन हजार रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मंजुरीसाठी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मडगाव कार्यालयात नुकत्याच झालेल्या सरपंचांच्या पंचायत उपसंचालक प्रसिद्ध नाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याविषयी ठराव संमत झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: हाय सायबा! दिवाळीपर्यंत पाऊस करणार मुक्काम; 2 दिवसांसाठी राज्यात 'Yellow Alert'

Goa Tourism: टॅक्सी, लॉजिंग, सीफूड झाले स्वस्त! GST कमी झाल्याने गोव्यात खिशाला परवडणाऱ्या पैशात करता येणार पर्यटन

Narkasur in Goa: संपूर्ण भारतापेक्षा गोव्याची दिवाळी असते खास! राक्षस वधाने होते पहाट, कुठे पाहाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Taj Mahal Fire Video: प्रसिद्ध ताजमहालच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराजवळ लागली आग, शॉर्ट सर्किटमुळं घडली घटना; व्हिडिओ आला समोर

NH 66 Closure: 'ट्रायल रन' फेल! सर्व्हिस रोडवरील गर्दीने पर्वरी हँग; चालकांनी व्यक्त केला तीव्र संताप

SCROLL FOR NEXT