Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

गोवा पंचायत निवडणुका लांबणीवर?

माविन गुदिन्हो यांचे संकेत: प्रभाग पुनर्रचना, आरक्षण अधिसूचित

दैनिक गोमन्तक

पणजी: पंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात सादर केलेला मसुदा सरकारने तत्त्वतः मान्य केला आहे. मात्र, अद्याप अनेक कामे बाकी आहेत. त्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडण्याचे  संकेत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले आहेत.  राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्याभरात  प्रभाग रचना आणि आरक्षण मसुदा अधिसूचित केला जाईल. त्यांनतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामकाजाला सुरवात होईल.

मात्र, यात अनेक कामे बाकी आहेत. या निवडणुका 4 मे ला घ्याव्यात असे ठरले होते. तशी तारीख आम्ही सरकारला पाठवली होती. यावर अद्याप सरकारकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत. राज्यातील 186 पंचायतींची मुदत 15 जूनच्या दरम्यान संपत आहे. त्यामुळे तत्पूर्वी निवडणुका होणे गरजेचे आहे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून यासाठीच काही प्रभागांची पुनर्रचना आणि आरक्षणासंबंधीचा मसुदा राज्य सरकारकडे पाठवला आहे. नागरिकांकडून सूचना दुरुस्त्या मागवल्या होत्या. त्यानुसार सुमारे 970 सूचना आणि दुरुस्त्या आल्या होत्या. यातील योग्य सूचना लक्षात घेऊन आणि दुरुस्त्या करून त्या राज्य सरकारला पाठविण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून या नव्या बदलांना मान्यता मिळाली असून या आठवड्याभरात यापुढची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT