Goa Panchayat Elections  Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुकीसाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्‍यकता नाही : देविदास पांगम

Goa Panchayat Elections : पंचायत निवडणुकीचा सरकारकडे विशेषाधिकार

दैनिक गोमन्तक

Goa Panchayat Elections : राज्यातील पंचायत निवडणुकीची मुदत येत्या 19 जूनला संपत आहे. ही निवडणूक राज्य सरकारने पावसाळ्यानंतर घेण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्‍यकता नाही. निवडणूक पुढे ढकलायची की निवडणूक प्रक्रिया थांबवायची हा राज्य सरकारचा विशेषाधिकार आहे, असा सल्ला महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सरकारला दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पंचायत निवडणुकासाठी ओबीसी आरक्षणासाठी तिहेरी चाचणी (ट्रीपल टेस्ट) होणे आवश्‍यक आहे, असे नमूद केले होते. त्यामुळे राज्यातील पंचायत निवडणूक ठरल्यावेळी घेण्याबाबत अडथळे निर्माण झाले होते. राज्यामध्ये ओबीसी सर्वे झालेला नाही त्यामुळे आरक्षण ठेवण्यासाठी तो करण्यास वेळ नसल्याने निवडणूक वेळेत घेण्यावरून संभ्रम निर्माण झाला होता. सरकारने या निवडणुकीसाठी तारीख न पाठवताच राज्य निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास सांगितले होते.

आयोगाने यासंदर्भात उत्तर देताना ही निवडणूक पुढे ढकलायची असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सूचित केले होते.

प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा

राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार सरकारने पंचायत निवडणूक पुढे ढलण्यासाठी न्यायालयात जावे लागेल यासंदर्भातचा सल्ला घेण्यासाठी फाईल महाधिवक्ता देविदास पांगम यांच्याकडे पाठवली होती. त्यांनी त्याची गरज नसल्याचे उत्तर दिल्याने पंचायत निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याचा तसेच 20 जूनपासून पंचायतींवर प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT