Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : आज ठरणार ‘कारभारी’; होणार सरपंच-उपसरपंच पदाची निवड

उत्सुकता शिगेला; बहुतांश ठिकाणी होणार भाजपचे सरपंच, उपसरपंच

दैनिक गोमन्तक

पणजी : सत्ताधारी भाजपने बहुतांश पंचायतींमध्ये आपल्या समर्थकांना विविध अर्थाची रसद पुरवली असून भाजपचेच पण सरपंच आणि उपसरपंच निवडून येतील याची काळजी घेतली आहे. यासाठी मंत्री, आमदारांबरोबर कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. बहुतांश पंचायतींमधील पदे निश्चिती झाली असून आज सोमवारी सकाळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर निवडीचे सोपस्कार पार पाडले जातील.

राज्यातील 186 पंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड आज सोमवारी होत आहे. 186 मधील 140 पेक्षा जास्त पंचायतींवर सत्ताधारी भाजपने दावा ठोकला असून या पंचायतींवर आमचे सरपंच निवडून येतील असे यापूर्वी जाहीर केले आहे. एकंदर राज्यभरातील पंचायत निवडणुकांचा आढावा घेतला असता हीच परिस्थिती दिसून येत आहे.

या निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आपली ताकद दाखविण्याची चालून आलेली संधी दवडता आली नाही. अपवाद वगळता या निवडणुकीमध्ये विरोधक निष्प्रभ ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश तालुक्यांमध्ये आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने आपली ताकद पणाला लावली असून मोठे लॉबिंग लावले आहे. दरम्यान, मये विधानसभा मतदारसंघातून प्रेमेंद्र शेट, सत्तरीमध्ये विश्‍वजीत राणे यांनी पंचायतींमध्ये आपली पकड घट्ट केली आहे. त्यामुळे भविष्यात याचा त्यांना नक्की फायदा होईल.

काही ठिकाणी फक्त औपचारिकता

बहुतांश ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच पदाचे उमेदवार निश्‍चित झाले आहेत. उद्या सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर निवडीचा सोपस्कार पार पाडला जाईल. यासाठी भाजपचे आमदार, मंत्री, माजी आमदार सक्रिय आहेत. पक्षाने त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

निवड प्रक्रियेसाठी 186 निवडणूक अधिकारी

राज्यातील 186 पंचायतींच्या 1528 पंच सदस्यांची 12 ऑगस्ट रोजी निवड निश्चित झाली आहे. अर्थात यातील 64 जण यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडी भयमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात व्हावेत यासाठी 186 निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा पंचायत खात्याने केली असून या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही निवडणूक होत आहे. हे अधिकारी सोमवारी सकाळी पंचायतींमध्ये पोहोचतील.

अनेक ठिकाणी महिलांची सरशी

186 पंचायतींपैकी 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने 62 पंचायतींवर राखीव जागेवरून सरपंचपदी महिला निवडून येतीलच. दक्षिण गोव्यात 29 तर उत्तर गोव्यात 33 ठिकाणी पंचायती महिला सरपंचसाठी राखीव आहेत. अनेक पंचायतींवर महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे 40 टक्के पेक्षा जास्त पंचायतींवर महिलाराज येईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिला निवडून येण्याचे मुक्त गोव्यातील हे पहिलेच उदाहरण आहे. वेळ्ळीत माजी सरपंच वीणा कार्दोज दशकभरानंतर प्रतिष्ठेच्या पदी येण्याची शक्यता आहे. उमेदवार निवडून आले आहेत.

दक्षिण गोव्यात ‘महिलाराज’

सरपंच आणि उपसरपंच नियुक्त करण्यासाठी चढाओढ लागली असून शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळी आमिषे दिली जात आहेत. अनेक ठिकाणी प्रामुख्याने सासष्टीत महिलाराज येणार अशी शक्यता आहे.

नुवेचे दोन माजी आमदार मिकी पाशेको यांच्या पत्नी व्हियोला आणि विल्फ्रेड डिसा यांच्या पत्नी फ्रेडा डिसा यांनी अनुक्रमे बेतालभाटी व नुवे पंचायतीत आपले पॅनल तयार केले आहे. प्रथमच निवडून आलेल्या व्हियोला बेतालभाटीत उपसरपंच होतील तर गत कार्यकाळात त्या पदावर असलेले अँथनी सरपंच होतील.

त्यांनी आपला प्रभाग राखतानाच दुस-या प्रभागातून आपल्या पत्नीलाही निवडून आणले आहे. दुसरीकडे नऊ सदस्यीय नुवे पंचायतीत माजी आमदार पत्नी फ्रेडा यांना सहा जणांनी पाठिंबा दिल्याने त्यांची सोयवारी सरपंचपदी निवड होऊ शकते. दुसऱ्या गटानेही सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. कोलवा येथे माजी सरपंच सुझी फर्नांडिस या दशकभरानंतर पुन्हा नेत्रुत्व करण्यास सिद्ध झाल्या आहेत.

उत्तर गोव्यात दबदबा

उत्तर गोव्यातील 19 मतदार संघांपैकी 10 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. अपक्ष डॉ.चंद्रकांत शेट्ये आणि मगोपचे जीत आरोलकर सत्ताधारी गटासोबत आहेत.

विरोधातील मायकल लोबो, दिलायला लोबो, कार्लुस फेरेरा, रुडाल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, केदार नाईक आणि आरजीचे विरेश बोरकर अपवाद वगळता या पंचायती निवडणुकीमध्ये आपला दबदबा राखू शकले नाहीत. याउलट थिवीमध्ये निळकंठ हर्ळणकर यांनी आठपैकी सात पंचायती जिंकल्या आहेत.

पर्वरीमध्ये तीन पंचायतींपैकी दोन पंचायती रोहन खंवटे यांच्याकडे आहेत. साखळीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

SCROLL FOR NEXT