Goa panchayat election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: दुसऱ्या दिवशी बार्देशातून 15 अर्ज दाखल

बार्देशातून दाखल झालेले 15 अर्ज पुढीलप्रमाणे

दैनिक गोमन्तक

म्हापसा: पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी बार्देश तालुक्यातून 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक सहा अर्ज हे कळंगुट मतदारसंघातील हडफडे-नागवा पंचायतीमधून आले. (Goa Panchayat Election 2022: 15 applications filed from Bardez on the second day )

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (ता. 19) अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी बार्देशातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे तब्बल 15 अर्ज आले. यात हडफडे-नागवा पंचायतीमधून 6 अर्ज, पोंबुर्फा-ओलावळी 1, शिवोली-मार्ना 1, शिवोली-सडये 1, सुकूर 2, वेर्ला-काणका 1 अर्ज आले; तर अस्नोडा 1, पेन्ह द फ्रान्स 1 व साळगाव पंचायतीमधून 1 अर्ज आला आहे.

वेर्ला-काणका प्रभाग 5 मधून ऐश्वर्या साळगावकर, सुकूर प्रभाग 3 मधून संतोष मोरजकर, प्रभाग 9 मधून सची मांजरेकर यांनी अर्ज भरला. सडये-शिवोली प्रभाग 6 मधून ओमकार हरमलकर, शिवोली-मार्ना प्रभाग 1 मधून सिद्धेश दाभोलकर, पोंबुर्फा-ओलावळी प्रभाग 3 मधून पांडुरंग साळगावकर; तर हडफडे-नागवा पंचायतीच्या प्रभाग 1 मधून शनाया नाईक, प्रभाग 2 मधून सखाराम नाईक.

प्रभाग 3 मधून रोशन रेडकर, प्रभाग 4 मधून आगुस्तिनो डिसोझा व व्हायोलोन्टा डिसोझा, प्रभाग ७ मधून अनिकेत शिरोडकर तसेच साळगाव पंचायतीच्या प्रभाग 3 मधून एकनाथ ओरस्कर; तर पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या प्रभाग 8 मधून राज नाईक यांनी अर्ज भरला. अस्नोडा पंचायतीच्या प्रभाग 8 मधून विजय बाणावलीकर यांचा एकमेव अर्ज आला. दरम्यान, सोमवार व मंगळवार मिळून दोन दिवसांत बार्देशातून आतापर्यंत एकूण 16 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बार्देश तालुक्यात एकूण 33 पंचायतींचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT