Goa Latest News: नागरी पुरवठा खात्याच्या गोदामामध्ये नासाडी झालेल्या तूरडाळ खरेदीसाठीचा आदेश अगोदर, त्यानंतर वित्त खात्याची मंजुरी घेतल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. या प्रक्रियेमध्ये नागरी पुरवठा तसेच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांचाही निष्काळजीपणा दिसून आला आहे.
हा प्रकार फाईल्समध्ये केलेल्या टिप्पणीतून उघड झाला आहे. त्यामुळे तूरडाळ नासाडी प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही चौकशी दक्षता खात्यामार्फत सुरू आहे.
कोविड महामारीच्या काळात रेशन कार्डधारकांसाठी सरकारने 800 मेट्रिक टन तूरडाळ खरेदी करण्याचे ठरविले होते. तूरडाळ खरेदीसाठी पैसे मंजूर करण्यासाठी फाईल वित्त खात्याकडे गेली असता अधिकाऱ्यांनी त्याला हरकत घेतली.
ही तूरडाळ बागायतदार संस्था, मार्केटिंग फेडरेशन तसेच बार्देश बाजारामधून रेशन कार्डधारकांना मिळत असल्याचा शेरा मारला होता. मात्र, नागरी पुरवठा खात्याच्या सचिवांनी एकूण तूरडाळीपैकी फक्त 408 मेट्रिक टन तूरडाळ खरेदीसाठीचा आदेश काढण्याचा शेरा मारला. त्यामुळे वित्त खात्याने त्याला मंजुरी देत असल्याचे फाईलवर नमूद केले होते.
पाच कोटी रुपयांचे नुकसान टळले
नागरी पुरवठा खात्याने 408 मेट्रिक टन तूरडाळ खरेदी केली होती. मात्र, त्यातील 242 टन म्हणजेच 2 लाख 42 हजार किलो तूरडाळीची गोदामात नासाडी झाली. त्यामुळे सरकारला 2 कोटींचा फटका बसला.
जर संपूर्ण 800 मेट्रिक टन तूरडाळ खरेदी केली असती तर 6 लाख 42 हजार किलो तूरडाळीची नासाडी झाली असती. त्यामुळे सुमारे 5 कोटींचे नुकसान झाले असते. सरकारने कमी प्रमाणात तूरडाळ खरेदी केल्याने मोठे नुकसान टळले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.