Tilari Canal |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Tilari Canal: तिळारी कालवा 45 दिवसांत दुरुस्त

Tilari Canal: जलस्रोत खात्याकडून पाण्याची पर्यायी सोय

दैनिक गोमन्तक

Tilari Canal: तिळारी धरणाच्या कालव्याचे डागडुजीचे काम सुरू असून त्यासाठी 45 दिवस जातील. परंतु याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार नाही; कारण पाण्याची पर्यायी व्‍यवस्था केली आहे.

साळ येथून पाणी पंप करून आमठाणे धरणात व आमठाणेतून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येत आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता केशव देशपांडे यांनी दिली.

बार्देश तालुक्यासाठी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई होणार नाही यासाठी खाते काळजी घेत आहे. तसेच पेडणे तालुक्यात पाणी चांदेल येथून घेतले जाणार आहे, असे देशपांडे म्हणाले.

तिळारी धरण महाराष्ट्रात असल्याने कालव्याच्या कामाचा खर्च महाराष्ट्र करणार आहे. कालव्याच्या डागडुजीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 45 दिवसांत ते पूर्ण केले जाईल, अशी आशा आहे, असे देशपांडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT