Crime News | Goa News
Crime News | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Panaji Crime News: गोव्यात गुन्हेगारीचा आलेख वाढताच; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विलास महाडिक

Panaji Crime News: गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या महिला अत्याचाराला बळी पडत आहेत. परप्रांतीय महिलांना मसाज पार्लरसाठी गोव्यात आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराची अनेक प्रकरणे घडलेली आहेत.

घरगुती हिंसा, बलात्कार व अपहरण यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण गोव्यासारख्या लहान राज्यात खूपच मोठे आहे. दरमहिना महिलांवर अत्याचाराची सरासरी 6 तर बलात्काराची 4 प्रकरणे नोंद होतात. पण बहुतांश महिला तक्रार करत नसल्‍यामुळे खूपशी प्रकरणे बाहेर येत नाहीत.

2017 साली महिलांवरील अत्याचाराची विविध पोलिस स्थानकांत 250 प्रकरणे नोंद झाली. 2018 साली ही संख्या 225 होती मात्र 2019 साली त्यामध्ये काही प्रमाणात घट होऊन ती दोनशेच्या आत म्‍हणजे 195 वर आली.

त्यानंतर 2020 साली 132 व 2021 साली 133 प्रकरणे नोंद झाली. तीन वर्षांत ही संख्या निम्म्यावर आली. यावर्षी 2022 मध्‍ये गेल्‍या दहा महिन्‍यांत 75 प्रकरणे नोंद झालेली आहेत. या पाच वर्षांत प्रकरणांची संख्या कमी झाली असली तरी अत्याचाराची प्रकरणे कमी झाली असे म्हणता येणार नाही.

गरीब कुटुंबातील महिला अत्याचार सहन करतात कारण त्यांना कोणाचा पाठिंबा नसतो. त्‍या पोलिस स्थानकांपर्यंत मदत घेण्यास पोचत नाहीत. 2017 साली गोव्यात बलात्काराच्या 75 तक्रारी नोंद झाल्या होत्या. तर, 2021 मध्ये 68 बलात्कार व 37 अपहरण प्रकरणांबाबत तक्रारी दाखल झालेल्‍या आहेत.

25 नोव्हेंबरच का?

25 नोव्हेंबर या तारखेला ऐतिहासिक महत्त्‍व आहे. 25 नोव्हेंबर 1960 साली डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये तीन मीराबेल बहिणींची हत्या करण्यात आली होती. या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येचे आदेश डॉमिनिकन हुकूमशहा राफेल ट्रुजिलो यांनी दिले होते.

1980च्या लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन महिलांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी 25 नोव्हेंबर हा दिवस जागरुकता पसरविण्यासाठी आणि महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी पाळण्याचा निर्णय घेतला, जो नंतर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाद्वारे स्वीकारला गेला.

"महिलांवरील हिंसा म्हटले की आपल्याला फक्त शारीरिक हिंसा वाटते. मात्र ही हिंसा खूप छोटा भाग आहे. सर्वांत मोठा भाग हा मानसिक हिंसेचा आहे. यात शिवीगाळ, अबोला, भावनिक छळ, वागणुकीचे अलिखित कठोर नियम यांचा समावेश होतो."

- डॉ. रुपेश पाटकर, मनोविकारतज्‍ज्ञ

"आताच्या पिढीकडे संयमचा अभाव दिसतो. बारीक-सारीक गोष्टींवरुन थेट पोलिस तक्रार केल्या जाताहेत. काही गोष्टी या आपापसात बोलून समजून सोडविता येतात. मारहाण किंवा शोषण होत असल्यास त्याविषयी आवाज उठविलाच पाहिजे."

- अ‍ॅड. हर्षा नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

Highest FD Interest Rates: FD धारकांसाठी आनंदाची बातमी, PPF-सुकन्या समृद्धी पेक्षा 'या' बँका देतायेत जास्त व्याजदर

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

SCROLL FOR NEXT