OBC Reservation Dainik Gomantak
गोवा

Reservation News: ओबीसी, एससी आरक्षणासाठी काँग्रेस राज्यपालांना भेटणार

Reservation News: प्रदेश समितीचा निर्णय : वैद्यकीय अभ्यासक्रमात हवे आरक्षण

दैनिक गोमन्तक

Reservation News: पदव्युत्तर स्तरावरील वैद्यकीय आणि दंतविज्ञान अभ्यासक्रमांमध्ये ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाच्या मुद्यावर राज्यपालांची भेट घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस भवनात झालेल्या नवनिर्वाचित गोवा प्रदेश काँग्रेस समिती प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता, हळदोणेचे आमदार कार्लोस अल्वारेस फरैरा, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, वरिष्ठ उपाध्यक्ष शेख आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पाटकर आणि आलेमाव यांनी भारत जोडो यात्रेत भाग घेतल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीची व चर्चेची माहिती बैठकीत दिली. राहुल गांधीं नी पक्ष बांधणीसाठी केवळ निष्ठावान आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनाच जबाबदाऱ्या देण्याची सूचना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात आला. तत्काळ सर्व गट समित्या आणि दोन्ही जिल्हा समित्यांचे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. माध्यम विभागाला बळकट करण्यावर त्याशिवाय पत्रके, पत्रकार परिषदांमध्ये शिस्त आणण्याचेही मान्य करण्यात आले.

भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

ओबीसी, एसटी आणि एससीसाठी वैद्यकीय अभ्यासक्रमात पदव्युत्तर स्तरावरील जागा राखीव ठेवण्याच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यपालांना भेटून आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्याचाही निर्णय झाल्याचे शेख म्हणाले. गोवा काँग्रेसचे पदाधिकारी या महिन्यात भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT