Girish Chodankar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: ‘त्या’ आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल

Girish Chodankar: घटनेतील ‘परिशिष्ट 10’चे उल्लंघन

दैनिक गोमन्तक

Girish Chodankar: भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या आठ आमदारांसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी विधानसभा सभापतींसमोर या आमदारांविरोधात अपात्रता याचिका सादर केली आहे. लवकरच याच प्रकारची आणखी एक याचिका काँग्रेसतर्फे सादर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या विधीमंडळातील दोन तृतियांश आमदारांचा गट भाजपमध्ये विलिन झाला असला तरी काँग्रेस पक्ष झालेला नाही. त्यामुळे भारतीय घटनेतील ‘परिशिष्ट 10’ चे उल्लंघन झाल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी चोडणकर यांनी माहिती हक्क कायद्याखाली सभापतींनी काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्याच्या पत्राला मान्यता दिली होती, त्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या आधारे ही याचिका सादर करण्यात आली आहे.

त्या आठ आमदारांनी केलेला प्रवेश घटनेतील नियमांचे उल्लंघन करणारे असल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. पुढील आठवड्यात काँग्रेस प्रदेश समिती व विधीमंडळ गट यांच्याकडून आणखी एक आमदार अपात्रता सादर होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्राने दिली.

15 नोव्हेंबरला सुनावणी

मागील भाजप सरकारमध्ये काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. त्याविरुद्ध चोडणकर यांनी दाखल केलेली आमदार अपात्रता याचिका सभापती आणि खंडपीठाने न्यायालयाने फेटाळली होती. त्याविरोधात चोडणकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यावरील सुनावणी येत्या 15 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT