Muslim | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: वर्ष उलटूनही खोर्ली मुस्लिम बांधव कब्रस्तानापासून वंचित

Goa News: जागा शोधण्याचे मानवी हक्क आयोगाचे निर्देश

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात कब्रस्तानचा प्रश्‍न दिवसेंदिवस अधिक जटील होत आहे. खोर्ली येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तानासाठी तिसवाडीमधील जुने गोवे, करमळी व कुंभारजुवे पंचायत क्षेत्रात सरकारकडे जागा नाही, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मानवी हक्क कायद्यानुसार मृत व्यक्तीला मोक्ष मिळावा यासाठी कब्रस्तानला लागणारी जागा उपलब्ध करण्याची गरज आहे, असे गोवा मानवी हक्क आयोगाने केलेल्या चौकशीत नमूद करून जिल्हाधिकाऱ्यांना खोर्ली परिसरातच जागा शोधण्यास 60 दिवसांची मुदत दिली आहे.

खोर्ली परिसरातील काही मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी करणारे निवेदन खोर्ली पंचायतीला दिले होते व त्याची एक प्रत मानवी हक्क आयोगाला 8 जुलै 2021 रोजी दिली होती.

आयोगाने या तक्रारीची दखल घेत खोर्ली पंचायतीला नोटीस बजावली होती. पंचायतीने दिलेल्या उत्तराने समाधानी न झाल्याने आयोगाने 13 नोव्हेंबर 2017 रोजी पालिका व पंचायत संचालकांना स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करण्याची शिफारस केली होती त्याबाबत पंचायतीला आयोगाने विचारणा केली होती. मुस्लिम बांधवांनी केलेल्या या निवेदनावर पंचायतीने बैठक घेतली होती.

महत्त्‍वपूर्ण शिफारशी

मानवी हक्क संरक्षण कायद्यानुसार, आयोगाने केलेल्या चौकशी अहवालातील शिफारशी सरकारला किंवा संबंधित अधिकारिणीला पाठविण्यात याव्यात. एका महिन्यात या शिफारशींवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे तसेच त्यांनी केलेल्या प्रक्रियेची किंवा काय कृती केली याची माहिती द्यावी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT