IFFI 2022 |Goa News
IFFI 2022 |Goa News Dainik Gomantak
गोवा

Adil Hussain On Satyajit Ray: ‘द स्टोरीटेलर’ म्‍हणजे सत्यजितना आदरांजली

दैनिक गोमन्तक

IFFI 2022 Updates: यंदाच्‍या इफ्फीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटाचे सादरीकरण झाले आणि त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट म्हणजे सत्यजित रे या महान व्यक्तिमत्‍वाला वाहिलेली आदरांजली होय,

असे प्रसिद्ध अभिनेते आदिल हुसेन म्हणाले. ‘टेबल टॉक’ या चर्चात्मक कार्यक्रमात या चित्रपटातील कलाकार आणि इतर तंत्रज्ञांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी हुसेन बोलत होते.

‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे हुसेन म्हणाले, चित्रपटाची कथा प्रख्यात चित्रपट निर्माते आणि कथाकार सत्यजित रे यांची आहे. कला नेहमी मुक्त असायला हवी. मात्र सध्याच्या काळात चित्रपट निर्मितीत मोठ्या प्रमाणात व्यापारी तत्वे अंतर्भूत झालेली आहेत. यावेळी अभिनेत्री तनिष्ठा चटर्जी, निर्मात्या सुछंदा चटर्जी उपस्थित होत्या.

पास न मिळाल्याने निर्मात्यांत नाराजी

इफ्फीच्या शुभारंभीच्या चित्रपटाचे पास सालाबादप्रमाणे गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना न पाठविल्यामुळे ‘फिल्म मेकर्स’ या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. यातून गोवा सरकारचा स्थानिक निर्मात्यांसमवेत असलेला सापत्नभाव स्पष्ट होतो, असा आरोप संघटनेने प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

गेली अठरा वर्षे स्थानिक निर्मात्यांना उद्‌घाटन व समारोपाच्या चित्रपटांचे पास मिळत होते. यंदा मात्र मनोरजंन संस्थेने निर्मात्यांना या पासपासून वंचित ठेवले आहे. यंदा फक्त उद्‍घाटन व समारोप सोहळ्याचे पास पाठविले आहेत.

चित्रपट क्षेत्रातील कलाकार हे अशा सोहळ्यांपेक्षा महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचे भुकेलेले असतात. गेल्या तीन-चार वर्षांत गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांची उपेक्षा सुरू आहे. त्यामुळेच यंदा गोवा विभागात एकही पूर्ण लांबीचा गोमंतकीय चित्रपट नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद म्हाडगुत यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT