Rishab Shetty |Goa News Dainik Gomantak
गोवा

Rishab Shetty IFFI 2022: '...तरच कोकणी सिनेमाला येतील सुगीचे दिवस'

Rishab Shetty IFFI 2022: ‘कांतारा’च्या दिग्दर्शकाने उलगडला सिनेप्रवास; आपल्‍या मातीतील गोष्‍टी पुढे आणा

दैनिक गोमन्तक

Rishab Shetty IFFI 2022: गोव्यातील कोकणी सिनेमावर मराठी, हिंदी, इंग्रजी सिनेमा वर्चस्व गाजवू लागला आहे. अशा वेळी कोकणी सिनेमाने जर या परभाषिक सिनेमांसोबत स्पर्धा करावयाची ठरविली तर ती त्याला कदाचित शक्य होणार नाही.

म्हणून कोकणी सिनेमाने आपल्या मातीतील छोट्या-छोट्या गोष्टी सक्षमपणे पुढे आणायला सुरवात केली तर लवकरच कोकणी सिनेमाला देखील चांगले दिवस येतील, असा विश्वास ‘कांतारा’ या सध्या गाजत असलेल्या कन्नड सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी व्यक्त केला.

इफ्फीमध्ये आयोजित सांस्कृतिक वैविधता आणि प्रादेशिक सिनेमांसाठी नवे स्थान’ या विषयावर आयोजित मास्टर क्लासमध्ये ऋषभ शेट्टी बोलत होते. प्रसिद्ध तमिळ निर्माते टी. जी. त्यागराजन यांनी त्‍यांच्यासोबत संवाद साधला.

‘कांतारा’ या आपल्या बहुचर्चित आणि सध्या देशभरात गाजत असलेल्या सिनेमाच्या अनुषंगाने ऋषभ शेट्टी यांनी एकूणच सांस्कृतिकता प्रादेशिक सिनेमा आणि भारतीय जनमानस याबद्दल खल केला आणि प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी त्यांनी बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषिकता यामुळे देशातील विविध छोट्या भाषा आणि छोट्या संस्कृतीसमोर प्रश्न उभे राहिले आहेत. गोवा असो किंवा कर्नाटकातील तुळूनाड, या भागातील प्रादेशिक भाषांसमोर हिंदी, इंग्रजीचे आव्हान उभे आहे. हे आव्हान या दोन्ही भाषांतील सिनेमासमोर सुद्धा नक्कीच आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.

भारत हा कृषीप्रधान देश. आपल्या देशात सगळे सण, उत्सव, आनंद, देवत्व हे कृषी संस्कृतीशी निगडित आहेत. अशावेळी कृषी संस्कृतीचा सन्मान करत शेतकऱ्यांची, आदिवासींची आणि त्यांच्या जगण्याची गोष्ट सांगणे मला नितांत गरजेचे वाटते. ‘कांतारा’ हा असाच एक प्रयत्न आहे, असे ते म्‍हणाले.

म्‍हणून मी करतो माझ्या भाषेतील सिनेमा

  • आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. त्यातल्या कित्येक भाषांत साहित्यकृती, सिनेमे तयार होतात. प्रत्येक भाषेचा-प्रांताचा सिनेमा हा वेगळा असतो. अशा वेळेला एकाच एक भाषीतला सिनेमा संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.

  • एखाद्या सिनेमाची गोष्ट देशभरातील सगळ्यांसाठी मार्गदर्शकही ठरू शकत नाही. मात्र प्रत्येक सिनेमातील काही ना काही बाबींसोबत प्रेक्षक स्वतःला जोडून घेतात आणि अशा सिनेमांसोबत त्यांचे नाते प्रस्थापित होते. असा प्रत्येक प्रेक्षकाला जोडून घेणारा, त्याच्या मनामध्ये स्थान निर्माण करणारा, विश्वास निर्माण करणारा सिनेमा भाषेच्या पलीकडे जाऊन पाहिला जातो.

  • ‘कांतारा’ हा अशा प्रकारचा सिनेमा झाला याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. पण म्हणून प्रत्येक सिनेमा पॅन इंडिया होऊ शकेल असा माझा दावा नाही. कारण मुळात एकच गोष्ट तेवढ्याच प्रमाणात आवडू शकेल याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे मी जगासाठी सिनेमा करीत नाही.

"कांतारातील ही गोष्ट माझ्या बालपणापासून मी पाहत आलो आहे, ऐकत आलो आहे. त्यामुळे ती लिहून काढत असताना आणि पुढे त्यावरती सिनेमाचे प्रयोजन करत असताना हा सिनेमा एवढा मोठा होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण आज देश-विदेशातून या सिनेमाला मिळत असलेला एकूण प्रतिसाद पाहूनखूप समाधान वाटले."

- ऋषभ शेट्टी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT