Kishan Reddy |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Kishan Reddy: गोव्याच्या पर्यटन विकासाला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य

Kishan Reddy: रोहन खंवटे यांनी नुकतीच दिल्लीत भेट घेऊन राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाबाबत चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील वेगवेगळ्या विकास प्रकल्पांना केंद्र सरकारच्या सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले आहे. राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नुकतीच त्यांची दिल्लीत भेट घेऊन राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा केली.

राज्यातील खाण व्यवसाय ठप्प झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार ठरला आहे. कोविड महामारीनंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी पर्यटन क्षेत्र महत्त्वाचे ठरले आहे. अशावेळी येथील पर्यटनाभिमुख प्रकल्पांना चालना देणे आवश्यक ठरल्याचे खंवटे यांनी रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिले.

गोव्याने जगाच्या पर्यटन नकाशावर आपली वेगळी छाप उमटविली आहे. भारतात येणारे विदेशातील पर्यटकांची पावले गोव्याकडे वळल्याशिवाय राहता नाहीत. शिवाय देशी पर्यटकांचा लोंढा देखील आता गोव्याकडे आकर्षित होत असून अशावेळी राज्यात नव्या पर्यटन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवणे किती गरजेचे आहे, यावरही केंद्रीय मंत्री रेड्डी व राज्याचे मंत्री खंवटे यांच्यात चर्चा झाली.

आध्यात्मिक पर्यटनावर भर

राज्य सरकारच्या नव्या पर्यटन प्रकल्पांच्या प्रस्तावांची रेड्डी यांना कल्पना दिली. नजीकच्या काळात हे प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येतील व राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

इको पर्यटनासह साहसी व जलक्रीडा पर्यटन, आध्यात्मिक पर्यटनावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करत असून केंद्राच्या सहकार्यामुळे लवकरच राज्याच्या पर्यटन क्षेत्रात मोठी क्रांती घडेल, असा विश्वास खंवटे यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT