CM Pramod Sawant |Goa News Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: वन हक्क अंतर्गत सनदांचे वाटप दोन वर्षांत निकाली

CM Pramod Sawant: सामाजिक कार्यासाठीही जमीन देण्यास तयार

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मदिन जनजाती गौरव सप्ताह म्हणून आयोजित केला जातो. या सप्ताहाच्या अनुषंगाने आदिवासींचे अधिकार काय आहेत याबाबत जागृती केली जात आहे. ज्यांनी वन हक्क कायद्याखाली जमिनीच्या सनदांसाठी दावे केले आहेत, ते येत्या दोन वर्षांत निकाली काढण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आदिवासी कल्याण संचालनालयाद्वारे आयोजित भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव व जमीन सनद वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, सचिव सुभाष चंद्रा, वनाधिकारी दिनेश कनन, जिल्हाधिकारी मामू हागे, संचालक त्रिवेणी वेळीप उपस्थित होत्या. यावेळी सुमारे 41 जणांना वन हक्क अंतर्गत सनदांचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आज ज्यांना वन हक्क कायद्यांतर्गत जमिनीच्या सनदा प्राप्त होत आहेत, त्यांनी त्या जमिनी प्रामुख्याने शेतीसाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे. मागील पिढ्यांनी ही जमीन कसली.

त्यामुळेच ही सनद आता प्राप्त होत असल्याने विविध प्रकारची पिके पिकवावीत. केवळ नागरिकांनाच नव्हे, तर सामाजिक कार्यासाठी, ग्रामपंचायत क्षेत्रात नवीन सभागृह आदी उभारण्यासाठी जमीन हवी असेल, तर ती देखील देण्यास सरकारची तयारी आहे.

आदिवासी आत्मनिर्भर व्हावा : तवडकर

बिरसा मुंडांचे कार्य सर्व आदिवासी समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आम्हाला आपल्या मूलभूत अधिकार प्राप्तीसाठी संघर्ष करावा लागला. मात्र, आताचे सरकार आदिवासींना सन्मान देण्याचे कार्य करत आहे. आदिवासी समाजातील अधिकाऱ्यांनी समाजाच्या वृद्धीसाठी काही काळ द्यावा, तसेच आदिवासी आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करावे, सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय

गोवा मुक्ती लढ्यात अनेक आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी देखील मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्यामुळे फर्मागुढी येथे आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय उभारले येणार आहे. त्यासाठी 6 हजार चौरस मीटर जागेची व्यवस्था करण्यात आली असून गोवा आदिवासी विकास महामंडळाद्वारे हे संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे संचालक त्रिवेणी वेळीप यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Women India: ‘जाय गे'? डोक्यावर ‘पाटलो’ आणि मासळी घेऊन दारोदारी सकाळी येणारी ‘नुस्तेकान्नी’; सागरकन्येचा संघर्ष

Pooja Naik: नोकरी घोटाळ्यात नवा ट्विस्ट, पूजा नाईकच्या वाढल्या अडचणी; IAS निखिल देसाईंनी पाठवली 'मानहानीची कायदेशीर नोटीस'

‘सुपरस्पेशलिटी’ हॉस्पिटलमध्ये नेत्यांचे सर्व विशेष उपचार केल्याने, जनतेच्या हॉस्पिटलांमध्ये खाटा मोकळ्या राहतील, ही काय कमी समाजसेवा आहे?

Chimbel Toyyar Wetland: पोर्तुगीज काळापासून पणजीला पाणी देणारा ‘व्हडाचे मांड’, चिंबलातील ‘तोय्यार’चे महत्त्व

Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब'चा डोंगर पोखरून उंदीरही हाती लागणार नाही, उलट 'पूजा नाईक'चा बळी दिला जाईल..

SCROLL FOR NEXT