Raju Nayak, Sandip Desai  Dainik Gomantak
गोवा

‘गोमन्तक’च्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार जाहीर

Award Function: माहिती खात्यातर्फे घोषणा : ज्येष्‍ठ पत्रकार सीरिल डिकुन्हा यांना ‘जीवनगौरव’

दैनिक गोमन्तक

Award Function: माहिती आणि प्रसिद्धी खात्‍यातर्फे पत्रकारिता पुरस्‍कारांची घोषणा करण्‍यात आली आहे. सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांना, तर वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार संदीप देसाई (गोमन्‍तक) यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार सीरिल डिकुन्हा यांना ‘जीवनगौरव’ पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

भारतीय वृत्तपत्र मंडळाच्या स्थापनादिनानिमित्त राष्ट्रीय पत्रकारिता दिवस बुधवार दि. 16 नोव्‍हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात दुपारी 3 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्‍कारांचे वितरण होईल.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती व प्रसिद्धी खात्‍याचे सचिव सुभाष चंद्र व इतर मान्यवर उपस्थित असतील. राजू नायक यांच्या ‘विद्वेशकारण’ या स्‍तंभलेखाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

विविध श्रेणींमध्ये प्रत्येकी रोख 10 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. गोवा एडिटर्स गिल्ड, गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट, फोटो जर्नालिस्ट असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन, स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन गोवा आणि दक्षिण गोवा पत्रकारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकारदिन साजरा केला जाणार आहे.

समर्पित सेवेचा सन्‍मान :

ज्येष्‍ठ पत्रकार सीरिल डिकुन्हा यांना त्यांच्या समर्पित सेवा आणि पत्रकारितेतील अफाट योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्‍यात आला आहे. शिवाय माजी संपादक राजेंद्र देसाई, विठ्ठलदास हेगडे, अरविंद टेंगसे, ज्येष्‍ठ पत्रकार पीटर डिसोझा आणि किशोर शेट मांद्रेकर यांचा पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल सदर कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार पांडुरंग गावकर करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madkai Fire News: ..आणि बघता बघता होत्याचे नव्हते झाले! मडकईत आगीचे थैमान; दागदागिने, कपडेलत्त्यांसह 10 लाखांचे नुकसान

Hill Construction Goa: डोंगर, टेकड्यांचा नाश रोखणार! मंत्री राणेंचे प्रतिपादन; 30% हून अधिक बांधकामांना मुभा देणार नाही

Goa Tree Cutting: झाडं तोडताय? सावधान! गोवा सरकारचे कडक निर्देश जारी; पारदर्शकतेसाठी नियमांत केले बदल

Goa Nightclub Fire: 'बर्च क्‍लब' आग प्रकरणाची धग वाढली! आणखी तिघे स्‍कॅनरखाली; अबकारी, अग्निशमनच्‍या अधिकाऱ्यांना नोटिसा

Horoscope: प्रगतीचा नवा अध्याय! 'या' राशींना मिळणार भाग्याची मोठी साथ, वाचा सविस्तर भविष्य

SCROLL FOR NEXT