Cold Patients | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्यात सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ

Goa News: वातावरणात बदल : नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात सर्दी खोकला पडसे डोकेदुखी अंगदुखी ताप येणाऱ्यांच्या संख्येत वाढली असून सरासरी प्रत्येक घरातील किमान एका सदस्याला ही बाधा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रूग्णसंख्येत वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण सततचा वातावरणातील बदल असून सोबत प्रदूषण, धूळ व ठिकठिकाणी साचलेले सांडपाणी हे देखील महत्त्वाचे कारण आहे.

नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करणे, पोषक आहाराचे सेवन करणे, स्वच्छता राखणे, आपल्या आजूबाजूला परिसर स्वच्छ करणे, सांडपाणी साचू न देणे, सर्दी, ताप, खोकला किंवा इतर आजार उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे.

त्यासोबतच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. शक्यतो उकलून गाळलेले पाणी पिणे या दिवसात अतिशय महत्त्वाचे आहे, तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळणे गरजेचे आहे.

वेळेत उपचार घ्या

अनेकांना सर्दी,पडसे किंवा ताप आल्यास त्यावरील फार्मसीतील गोळी घेतात. मात्र नागरिकांनी योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. काहीवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तचाचणी करणे देखील गरजेचे असते. त्यामुळे आजार अंगावर काढणे टाळणेच गरजेचे आहे.

"सर्दी,तापाच्या रुग्णात वाढ झालेली आहे. पणजी शहरात सुरू असलेले खोदकाम, साचलेल्या सांडपाणी आदी कारणांमुळे रुग्ण वाढलेले आहेत. सर्दी खोकल्या सहित डेंग्यू आणि मलेरियाचे देखील रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेणे जरुरीचे आहे. तसेच यासाठी आरोग्य विभागाद्वारे देखील योग्य ती पाऊले उचलण्याची गरज आहे."

- डॉ. श्रुती सावंत, पणजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT