CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 3 पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश; आणखी 17 संशयित रडारवर, CM सावंतांनी दिली माहिती

Goa CM Security Meeting: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (25 एप्रिल) पार पडलेल्या बैठकीत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यासोबत राज्यात राहत असलेल्या काश्मिरी नागिरकांना सुरक्षा देण्यासंबंधी निर्णय घेण्यात आले.

Manish Jadhav

पणजी: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांसह पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता गोव्यातील 3 पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (25 एप्रिल) पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यासोबत राज्यात राहत असलेल्या काश्मिरी नागिरकांना सुरक्षा देण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला.

गोव्यातील 3 पाकिस्तानींना देश सोडण्याचा आदेश

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीला सरकारमधील मंत्र्यांसह पोलिस प्रमुखांनी हजेरी लावली. गोव्यातील 3 पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले. याशिवाय, 17 पाकिस्तानी नागरिकांवर पोलिस लक्ष ठेवून असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पोलिस कॉम्बिंग ऑपरेशन राबवणार

तसेच, शनिवारपासून (26 एप्रिल) राज्यात पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. पर्यटन स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यासोबत नाकाबंदी करण्यात येणार आहे. याशिवाय, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना सांगितले.

परप्रांतियांची कडक तपासणी होणार

याशिवाय, राज्यात राहत असलेल्या परप्रांतियांची कडक तपासणी करण्यात आहे. आठवडी बाजाराच्या ठिकाणी येणाऱ्या परप्रांतियांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. तसेच, राज्यात राहत असलेल्या काश्मिरी नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT