Yurli Alemao Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत कुंकळ्ळीकरांसाठी ‘शाप’; मुख्यमंत्र्यांनी पाहणी करावी : युरी आलेमाव

Rajat Sawant

Goa Opposition Leader Yuri Alemao Writes To CM On Cuncolim Industrial Estate Issue: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही कंपन्यांच्या प्लांटमधून वायू व जलप्रदूषण होत असल्याने औद्योगिक वसाहत कुंकळ्ळीकरांसाठी ‘शाप’ बनली आहे. मी वारंवार मागणी करुनही सरकारी अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केलेली नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व संबंधित अधिकार्‍यांसह कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील समस्यांची संयुक्त पाहणी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

आलेमाव यांनी पत्रात असे नमूद केले की, "वायू व जलप्रदूषण, बेकायदेशीर शेतजमिनीवर अतिक्रमणे यामुळे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत कुंकळ्ळीकरांसाठी ‘शाप’ बनली आहे. मी वारंवार मागणी करूनही सरकारी अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केलेली नाही."

"गोवा विधानसभेच्या गेल्या पाच अधिवेशनात मी वारंवार हा मुद्दा उपस्थित करत आहे. दुर्दैवाने सरकारने आजपर्यंत काहीही केले नाही. कुंकळ्ळीतील नागरीकांच्या आरोग्याशी खेळणे ताबडतोब बंद न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असून त्यास सरकार पूर्णपणे जबाबदार असेल असा इशारा आलेमाव यांनी दिला.

या कारखान्यांच्या आवारात जवळपास ४०० स्थलांतरित कामगार बेकायदेशीरपणे राहतात असा दावा करीत कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत अनेक भीषण अपघात झाले असल्याचे आलेमाव यांनी सांगितले

आलेमाव म्हणाले, 2020 मध्ये कुंकळ्ळीतील एका कंपनीत अमोनीयाची गळती झाली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. काही आस्थापने बेकायदेशीरपणे जास्त उत्पादन करत आहेत आणि त्यामुळे राज्याच्या महसुलाचे नुकसान होत आहे."

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेवून पाहणी करावी. सरकारने यापुढे कुंकळ्ळीकरांच्या सहनशिलतेची परीक्षा घेऊ नये असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT