CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणी विरोधकांचा हल्लाबोल, न्यायालयीन चौकशीच्या मागणीने सावंत सरकारवर दबाव

Sawant government: सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची प्रकरणे राज्यभरात उघडकीस येऊ लागल्यानंतर याचे तपासकाम विशेष तपास पथकाकडे किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवावे, यासाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची प्रकरणे राज्यभरात उघडकीस येऊ लागल्यानंतर याचे तपासकाम विशेष तपास पथकाकडे किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवावे, यासाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. या प्रकरणात अनेक जणांना अटक झाली असली तरी ते पैसे नेमके कोणाला देण्यात येत होते, याचा शोध लावण्यासाठी निःपक्ष चौकशीची मागणी होऊ लागली आहे.

कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते या विषयावर एक सुरात बोलू लागले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेने अशा प्रकरणात तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केल्यानंतर दिवसाला किमान एक तक्रार नोंदवली जाऊ लागली आहे. फोंडा हे पूर्वी अशा प्रकरणाचे केंद्रबिंदू म्हणून पुढे आले होते. आता त्याची व्याप्ती वाढू लागली आहे. जुने गोवे, पर्वरी, काणकोण येथेही तक्रारी नोंदविल्या आहेत. अद्यापही यातून काय निष्पन्न होते, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

उमेदवारांकडून पैसे घेणाऱ्यांना कोठडीची हवा खावी लागत असली तरी ते पैसे त्यांच्याकडून नोकरी देणाऱ्या किंवा नोकरी देण्याचा निर्णय प्रभावित करणाऱ्या कोणाला देण्यात येत होते याची माहिती त्यांच्याकडून वदवून घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्याचमुळे हे तपासकाम विशेष तपास पथक किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सोपवावे, अशी वाढती मागणी आहे. त्याचा सरकारवर दबाव वाढू लागला आहे.

पूजाचा आता पर्वरी पोलिसांकडून पाहुणचार

सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या पूजा नाईक हिला पर्वरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. तिच्यासह तिघांविरुद्ध पर्वरी पोलिस स्थानकात प्रिया मांद्रेकर यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

म्हार्दोळ व डिचोली येथील पोलिस स्थानकातील चौकशीनंतर तिला आता पर्वरीतील तक्रारीत अटक केली आहे. तक्रारदाराने सरकारी नोकरीसाठी संशयित अजित सतरकर आणि अनिशा सतरकर या दोघांच्या खात्यात ४ लाख रुपये जमा केले होते. संशयितांचे मुख्य सूत्रधार पूजा नाईक हिच्याशी लागेबांधे होते. पैसे देऊनही सरकारी नोकरी न मिळाल्याने ते पैसे परत करण्यासाठी तक्रारदाराने तगादा लावला होता. मात्र, संशयितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पूजाला म्हार्दोळ पोलिसांनी नोकरी विक्री घोटाळ्यात अटक केल्यानंतर तक्रारदार मांद्रेकर यांनी पर्वरीत पोलिसांत तक्रार दिली होती.

काणकोणच्या आणखी एका युवकाची फसवणूक

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून वेलवाडा-पैंगीण येथील कृष्णा कमलाकर नाईक या युवकाकडून ५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस खात्यांत नोकरी देतो, असे सांगून २०२० साली मोर्ले-सत्तरी येथील रामेश्वर आत्माराम मांद्रेकर आणि पोळे-लोलये येथील रवीन भंडारी यांनी कृष्णा याच्याकडून ५ लाख रुपये घेतले. मात्र, गेली चार वर्षे ते नोकरी देऊ शकले नाहीत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नोकरीच्या आमिषाने फसवणूकप्रकरणी पोलिस चांगले काम करत आहेत. प्रत्येक प्रकरण स्वतंत्र व वेगळे आहे. डिचोलीत झालेली फसवणूक तर राज्याशी संबंधितही नाही. या प्रकरणात ज्यांची ज्यांची नावे पुढे येतील, त्यांना पोलिस पकडतील. पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास सांगण्यात आले आहे. यातून कोणीही सुटू शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya: ..हाच तो दिवस! शुभवार्ता मिळणार; 'या' राशींनी तयार रहा

Bajirao Peshwa: निजाम पुण्यात घुसला, बाजीरावांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळवला; अपराजित सेनापतीची ऐतिहासिक लढाई

क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानच्या स्टार खेळाडूला अटक, फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवर केला अत्याचार

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

SCROLL FOR NEXT