गोव्यातल्या इतिहासातील एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे जनमत कौल किंवा अस्मिता दिवस. या दिवशी गोव्याला गोवा म्हणून त्याची स्वतंत्र ओळख मिळाली होती "आमकां नाका श्रीखंड पुरी जाय आमकां शीत कढी " अशा उद्धघोषतून गोव्याची अस्मिता वाचवण्यासाठी लाखो गोवेकर एकत्र आले आणि त्यांनी गोव्याला महाराष्ट्रातत विलीन होण्यापासून वाचविले ही घटना घडली होती 16 जानेवारी 1967. आजही या घटनेला अनन्य महत्व दिले जाते. ज्या घटनेने गोवेकरांना गोमंतकीय म्हणून भूषवण्याची संधी दिली याच घटनेच्या आधारित जाणून घेऊया विद्यार्थ्यांच्या भावना
आज जनमत कौलला ५७ वर्षे झाली आहेत एवढ्या वर्षात गोव्याने खूप प्रगती केली आहेत हे बघताना एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे आमच्या पूर्वजांनी केलेल्या कार्यामुळे गोवा टिकून राहिला आहे. त्यांच्यामुळे आजचा गोमंतक हा समृध्द गोमंतक झालेला आहे. विचार करण्यासारखा आहे जर आज गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर कोकण प्रदेशासारखी गत गोमंतकाची झाली असती. गोव्यातील माणसे जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र येतात तेव्हा काय होवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणुन आपण या निकालाकडे पाहू शकतो.आशिष नारायण परवार, मराठी अध्ययन शाखा, गोवा विद्यापीठ.
"इतर लोकांच्या दृष्टीने स्वतःची व्याख्या करू नका. तुमची स्वतःची ओळख निर्माण करा". आज गोमंतक (गोवा) हा ५८वा ‘अस्मिताई दिवस’ साजरा करत आहे, ज्या दिवशी भारताच्या निवडणूक आयोगाने घेतलेल्या एकमेव सार्वमताने हा छोटासा प्रदेश महाराष्ट्राचा दक्षिणेकडील जिल्हा बनण्यापासून वाचवला. गोमंतकाला(गोव्याला) स्वतंत्र ओळख देण्यासाठी १९६७ मध्ये जनमत चाचणी घेण्यात आली होती. गोव्याने खूप खडतर लढा दिला आणि शेवटी गोमंतक (गोवा) राज्य एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून राहिले आणि शेजारच्या महाराष्ट्रात विलीन होण्यापासून वाचले. खरंच गोवा हे छोटे राज्य असले तरी आज आपण उंच आणि सुंदर उभे आहोत.अक्षदा सावंत देसाई
नव गोमंतकाच्या दिशेने वळताना आपण ज्या विलक्षण दिवसाला स्मरतो , तो हा दिवस म्हणजे ओपिनियन पोलचा . ह्या दिवशी एवढंच सांगू इच्छातो की ऐतिहासिक चूका विसरात भाऊसाहेब आणि सिक्वेरा पैकी कोणालाच खलनायक मानू नकात . दोघांचेही उज्जवल गोमंतकासाठी बरेच योगदान आहे व दोघेही आपल्या निजी आयुष्यात मित्र होते. अंतत: गोमंतक वेगळा राज्य झाल्या कारणानेंच उन्नत झाला आहे, नाहीतर आज त्याची गत कारवार व मालवण सारखी झाली असती.अभिनव सिताराम काटकर
गोव्याला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लढावे लागले आणि त्याचे श्रेय हे आपल्या पूर्वजांना जाते. जनमत कौलद्वारा गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण न करता गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व असावे. या निर्णयामुळे १९६७ला गोव्याला स्वतंत्र अस्तित्व, आपल्या कोकणी भाषा राज्यभाषा म्हणून टिकवून राहीली. गोवा ओपिनियन पोलने या प्रदेशाच्या राजकीय, समाजित, आर्थिक स्थितीला आकार देण्याचे कार्य केले. या महत्वपूर्ण भूमिकेमुळे प्रत्येकाला आपले मत- विचार मांडण्याचा हक्क मिळाला. त्यावेळी जे लोक महाराष्ट्रात विलीन होण्याचे स्वप्न पहात होते ते कदाचित आता जे झाले ते चांगलेच असे म्हणत असेल.पूर्वा शिरोडकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.