Opinion Poll Day Dainik Gomantak
गोवा

Goa Opinion Poll Day: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विधानसेतील आश्वासनाचा विसर?

CM Pramod Sawant: गोव्याने या ऐतिहासिक दिवसाची ५८ वर्ष पूर्ण केली आहेत, मात्र या दिवसाची सरकार किंवा विरोधी पक्षांकडून कुठलीच तयारी दिसत नसल्याने प्रश्नचिह्न निर्माण झालंय

Akshata Chhatre

CM Sawant on Goa Opinion Poll Day

पणजी: गोव्याला मुक्ती मिळाल्यानंतर गोवा स्वतंत्र राज्य बनेल की महाराष्ट्रात विलीनीकरण होणार यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. यानंतर गोव्यात १६ जानेवारी १९६७ रोजी एक मतदान घेण्यात आलं ज्याला ओपिनियन पोल डे असं म्हणून ओळखलं जातं. यंदाच्या वर्षी गोव्याने या ऐतिहासिक दिवसाची ५८ वर्ष पूर्ण केली आहेत, मात्र या दिवसाची सरकार किंवा विरोधी पक्षांकडून कुठलीच तयारी दिसत नसल्याने प्रश्नचिह्न निर्माण झालंय.

सरकारचे मौन का?

गेल्यावेळी विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः ओपिनियन पोल डे किंवा अस्मिताय दिवस साजरा केला जाईल असे आश्वासन दिले होते, मात्र आज जेव्हा तो दिवस आलाय तेव्हा मुख्यमंत्री काहीही करताना दिसत नाहीये. आता मुख्यमंत्री स्वतःच त्यांच्या आश्वासनाबद्दल विसरले आहेत का? सरकारकडून आजचा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी काहीही तयारी का केली नाही? असा प्रश्न निर्माण झालाय.

१९ जुलै २०२४ रोजी झालेल्या अधिवेशनात कुंक्कळीचे आमदार युरी आलेमाव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुखमंत्र्यांनी स्वतः हा अस्मिताय दिवस माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी सुरु केला असल्याने त्याचं महत्व कायम राहील असं आश्वासन दिलं होतं.

विरोधीपक्ष देखील आजचा दिवस विसरलेत का?

मुख्यमंत्र्यांचे आजच्या दिवसावर मौन कायम असले तरीही विरोधी पक्ष देखील तीच री पुढे ओढतायत. विरोधी पक्षातील प्रमुख नेते जसे की युरी आलेमाव, अमित पाटकर आणि अल्टोन डिकोस्टा सध्या गोव्यात नाही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील आंबेली येथे एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, ज्याला केवळ खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी हजेरी लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT