Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : राज्यात आदिवासी-कष्टकरी समाजानेच जपली संस्कृती : दिलीप धारगळकर

Goa News : अडवईत आदिरंगोत्सव थाटात

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : गुळेली, गोमंतकातील आदिवासी कष्टकरी समाजानेच येथील संस्कृती जपण्याचे कार्य आजता‌गायत केले आहे,असे प्रतिपादन लोकसंस्कृती अभ्यासक प्रा. दिलीप धारगळकर यांनी केले. गोमंतकातील कुठलीही लोककला ही याच समाजाने सादरीकरणातून जपली आहे.

त्यामुळे गोमंतकातील मूळ पुरुष हा हाच आदिवासी समाज आहे,असेही ते म्हणाले.भूमीपूत्र सेवा संघटना आणि कला व सांस्कृतिक खाते गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने चौथा युवा आदिरंगोत्सव अडवई सत्तरी येथे झाला.

या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धारगळकर बोलत होते. तसेच व्यासपीठावर प्रा.संजय तेंडुलकर, भूमीपूत्र सेवा संघटना अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे, सचिव डॉ. अजय गावडे, शंभा गावडे, डॉ.रुपचंद न्हावेलकर आदि मान्यवर होते.

खास निमंत्रित प्रा. संजय तेंडूलकर म्हणाले की या आदिवासी समाजाने इतरांना मोठे करण्यासाठी स्वतः कष्ट सोसले आहेत.या ठिकाणच्या जमिनींचे खरे मालक हेच आहेत कारण त्यांनी स्वकष्टाने त्या जमिनी कसल्या आहे,असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन दिव्या गावकर व उमेश खोलकर यांनी केले. स्वागत डॉ. वेंकू गावडे यांनी केले. डॉ. अजय गावडे यांनी आभार मानले.

विविध स्पर्धांचे आयोजन

दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात नमन, वक्तृत्व ,पथनाटय, लोकनृत्य, शूटिंग, रांगोळी, फेस पेंटींग, पाककला, फोटोग्राफी, फाती व फुलांचे हार, प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. महोत्सवात महिला मंडळातर्फे नैसर्गिक साहित्यावरील तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Lake: पुन्हा उघडतोय मयेचा तलाव, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः केली पाहणी; नेमकी तारीख काय? वाचा 

Sawantwadi Beef Smuggling: आत याल तर जीव देऊ! कात्री दाखवत महिलेची पोलिसांना धमकी; सावंतवाडीत 80 किलो गोमांस जप्त

"50 हजार तालांव, 48 तास कोलवाळ जेल", दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पर्यटकांवर लोबोंनी काढलाय 'जालीम' उपाय!

टीम इंडियाचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वेस्ट इंडीजला सलग 10व्या कसोटी मालिकेत चारली पराभवाची धूळ; दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाशी केली बरोबरी VIDEO

India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT