Onion Prices Dainik Gomantak
गोवा

Onion Prices: कांद्याने गाठली 80 रुपयांची पातळी! 2 महिन्यांत किलोमागे 30 रुपयांची वाढ; शंभरी गाठण्याची शक्यता

Onion Price Hike: गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका उडाला असून, दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याचे दरही वाढले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका उडाला असून, दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याचे दरही वाढले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत ७० रुपये किलो असलेला कांदा आता ८० रुपयांवर पोहोचला आहे.

चतुर्थीनंतरच्या दोन महिन्यांत कांद्याच्या दरात किलोमागे ३० रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याने भाव खाल्ल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे. कांद्याचा तुटवडा आणि आवक घटल्याने दरवाढ होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पुढील महिन्यापर्यंत कांद्याचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डिचोली बाजारात बहुतांश भाजीपाला कर्नाटकातून येतो. यंदा कर्नाटकात समाधानकारक पाऊस न झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला असून, बाजारातील आवक घटली आहे. सध्या अन्य भाज्यांचे दर नियंत्रणात असले, तरी आगामी काळात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. रमेश रेड्डी यांच्यासह अन्य विक्रेत्यांनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे कांद्यापाठोपाठ अन्य भाज्याही महागण्याची चिंता गृहिणींना सतावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Performance: निवडणूक जवळ येताच सरकारचा कामाचा धडाका! मग मागील पावणेचार वर्षे फाईली का रखडल्या?

Rediscover Yourself: आयुष्यभर इतरांसाठी जगलात, आता स्वतःसाठी जगा! अपूर्ण स्वप्नांना पुन्हा द्या नवी भरारी

टेक जगताला हादरवणारा सायबर हल्ला! Zoom, CNN आणि BBC सह 170 हून अधिक वेबसाईट्सना मालवेअरचा तडाखा; कोट्यवधी युजर्सचा डेटा धोक्यात

UPI Transactions Record 2026: दिवाळीत यूपीआयचा महाधमाका! ऑक्टोबर महिन्यात तब्बल 31.53 लाख कोटींची उलाढाल; डिजिटल पेमेंटने रचला नवा इतिहास

Ramayana Cultural Heritage: रामायणाचा गौरव म्हणजे हिंदुत्वाचे समर्थन नव्हे! भारतीय संस्कृतीचा वारसा राजकारणापासून वेगळा ठेवा

SCROLL FOR NEXT